अकोला : वाशीम जिल्ह्यात सकाळपासून शांततेत मतदानाची प्रक्रिया सुरू झाली. काही ठिकाणी मतदान यंत्र बंद पडल्याच्या तक्रारी समोर आल्या होत्या. प्रशासनाने त्याची दखल घेऊन मतदान प्रक्रिया सुरळीत केली. काही ठिकाणी मतदार यादीत नावे नसल्याने मतदानापासून नागरिकांना वंचित रहावे लागले. वाशीम जिल्ह्यात सकाळी ९ वाजेपर्यंत ५.३३ टक्के मतदान झाले. पहिल्या सहा तासांमध्ये जिल्ह्यात सरासरी २९.३१ टक्के मतदान झाले. यामध्ये सर्वाधिक मतदान ३३.७९ टक्के मतदान वाशीम मतदारसंघात झाले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सायंकाळी ५ वाजेपर्यंत ५७.४२ टक्के मतदान झाले होते. यामध्ये रिसोड मतदारसंघात ६०.१८ टक्के, कारंजा मतदारसंघात ५५.२२ व वाशीम मतदारसंघात ५६.८७ टक्के मतदान झाले आहे. मतदानासाठी सायंकाळी ६ वाजेपर्यंतची मुदत असली मतदान केंद्रावर उशीरापर्यंत मतदारांच्या रांगा दिसून आल्या. वाशीम जिल्ह्याचे सरासरी मतदान ६५ टक्के झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मतदानासाठी विविध ठिकाणी तयार केलेले आदर्श मतदान केंद्र मतदारांना आकर्षित करीत होते.

हेही वाचा – चंद्रपूर : शहरात मतदारांमध्ये निरुत्साह तर ग्रामीणमध्ये उत्साह, सायंकाळी ५ पर्यंत ६४.४८ टक्के मतदान

u

वाशीम जिल्ह्याच्या कारंजा तालुक्यातील तपोवन गावामध्ये नागरिकांनी ऐतिहासिक आनंदाचा क्षण साजरा केला. तपोवन गावात मतदान केंद्र क्र. १८९ ची स्थापना केली. हा निर्णय गावातील मतदारांसाठी महत्त्वपूर्ण ठरला असून, लोकशाही बळकट करण्यासाठीचा हा एक मोठा टप्पा मानला जात आहे.

स्वतंत्र भारताच्या इतिहासात प्रथमच तपोवन गावात मतदान केंद्र सुरू करण्यात आले. मतदान केंद्रामुळे गावातील प्रत्येक मतदाराला आपला मतदानाचा हक्क बजावता आला. विशेषतः महिला, वृद्ध, आणि दिव्यांग मतदारांसाठी ही सुविधा उपयुक्त ठरली. तपोवन गावाचा हा आदर्श उपक्रम इतर ग्रामीण भागांसाठीही प्रेरणादायी ठरेल आणि ग्रामीण लोकशाही प्रक्रियेला अधिक बळकटी देईल. या यशस्वी उपक्रमासाठी जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस, उपजिल्हा निवडणूक अधिकारी राम लंके तसेच कारंजा-मानोरा विधानसभेचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी कैलास देवरे यांनी विशेष प्रयत्न केले.

हेही वाचा – उमरखेडमध्ये सरपंचावर हल्ला, यवतमाळ जिल्ह्यात सरासरी ६१ टक्के मतदान

युवांसह ज्येष्ठ नागरिकांचा चांगलाचा उत्साह

विधानसभा निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेत वाशीम जिल्ह्यात युवांसह ज्येष्ठ नागरिकांचा चांगलाचा उत्साह दिसून आला. मतदानासाठी विविध केंद्रांवर चांगली गर्दी उसळली होती. जिल्ह्यात काही ठिकाणी यंत्रात बिघाड व मतदार यादीत नावे नसल्याच्या तक्रारी होत्या. जिल्ह्यातील तिन्ही मतदारसंघात सायंकाळी ५ वाजेपर्यंत ५७.४२ टक्के मतदान झाले. सायंकाळी उशीरापर्यंत केंद्रांवर मतदानाची प्रक्रिया सुरू होती. जिल्ह्यातील एकूण सरासरी ६५ टक्के मतदान झाल्याचा अंदाज आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Polling station for the first time in tapovan village of karanja taluka of washim district and washim district voting percentage rsj 74 ssb