Presence of Ashish Deshmukh when Shashi Tharoors application filed for Congress president election | Loksatta

काँग्रेस अध्यक्षपद निवडणूक : शशी थरुरांना ‘या’ मराठी नेत्याचा पाठिंबा! उमेदवारी अर्ज भरताना दिल्लीत उपस्थिती

शशी थरूर यांनी काँग्रेसच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी शुक्रवारी उमेदवारी अर्ज भरला.

काँग्रेस अध्यक्षपद निवडणूक : शशी थरुरांना ‘या’ मराठी नेत्याचा पाठिंबा! उमेदवारी अर्ज भरताना दिल्लीत उपस्थिती
काँग्रेस अध्यक्षपद निवडणूक

काँग्रेस अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करणारे डॉ. शशी थरूर हे दोन दिवसांच्या नागपूर दौऱ्यावर येणार आहेत. दौऱ्यादरम्यान ते दीक्षाभूमीला भेट देणार आहेत, अशी माहिती काँग्रेसचे नेते डॉ. आशीष देशमुख यांनी दिली. नवी दिल्ली येथे डॉ. शशी थरूर यांनी काँग्रेसच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी शुक्रवारी उमेदवारी अर्ज भरला. त्यावेळी त्यांच्यासोबत डॉ. देशमुख उपस्थित होते.

हेही वाचा- डॉ. सुधीर गुप्ता यांची उचलबांगडी ! १७ वर्षीय मुलीच्या मृत्यू प्रकरणात कारवाई

डॉ. देशमुख हे भाजपाची आमदारकी सोडून काँग्रेसमध्ये परत आले. त्यांना सुरक्षित मतदारसंघ मिळेल, असे वाटत होते. परंतु त्यांना दक्षिण-पश्चिम नागपूर येथून उमेदवारी देण्यात आली. अजूनही ते मतदासंघ शोधत आहेत.

हेही वाचा- “बच्चू कडू यांचा संयम सुटला”; कार्यकर्ता मारहाण प्रकरणावरुन नवनीत राणांची टीका

सावनेर मतदारसंघात पक्षविरोधी कारवाई केल्याच्या आरोपाने ते चर्चेत आले होते. त्यानंतर विधान परिषदेतील पराभवाला प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना जबाबदार धरून त्यांच्या राजीनाम्याची मागणी त्यांनी केली होती. त्यांनी राज्यसभेवर महाराष्ट्रातून उत्तर प्रदेशातील व्यक्तीला पाठवण्याच्या पक्षाच्या निर्णयावरही टीका केली होती. आता ते शशी थरूर यांच्या समर्थनार्थ दिल्लीत पोहोचले. थरूर यांच्या दौऱ्याबाबत त्यांनीच माहिती दिली. १ व २ ऑक्टोबरला शशी थरूर नागपूरच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांचे विचार ऐकण्यासाठी समस्त काँग्रेस पदाधिकारी, नेते व कार्यकर्त्यांनी अवश्य यावे, असे आवाहन डॉ. देशमुख यांनी केले आहे.

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
डॉ. सुधीर गुप्ता यांची उचलबांगडी ! १७ वर्षीय मुलीच्या मृत्यू प्रकरणात कारवाई

संबंधित बातम्या

नागपूर विद्यापीठातील निवडणुकीत काँग्रेसमधील घरभेदी कोण?
नागपूर: विद्यापीठाच्या निवडणुकीत शिक्षक गटात महाआघाडीला धक्का; खुल्या वर्गातील सहा जणांचा विजय
गोंदियाचे अपक्ष आमदार विनोद अग्रवाल नेमके कोणाचे? राज्यसभा मतदानासाठी भाजप- शिवसेनेकडून दावे-प्रतिदावे
अजय नावंदरच्या अटकेने अमरावतीतील समर्थक हादरले ; डीएचएफएल घोटाळा
‘आठ वर्षे होऊनही मराठी भाषा धोरण का नाही’? ; श्रीपाद जोशी यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

व्हिडिओ

ताज्या बातम्या
पाठ्यपुस्तकात ‘२६/११’चा धडा घेणार; चंद्रकांत पाटील यांची माहिती
Video: गोष्ट पुण्याची – तुम्ही कधी मूर्ती नसलेलं मंदिर पाहिलंत का? अशाच एका मंदिराची ही गोष्ट!
पुणे: गणेशखिंड रस्त्यावर दुमजली उड्डाणपुलाच्या कामासाठी वाहतूकीत बदल
FIFA World Cup 2022: “माझ्या बालपणीचे स्वप्न…” रॉबर्ट लेवांडोस्कीने पोलंडच्या विजयानंतर व्यक्त केल्या भावना
“तिचे फोटो लोक रात्री बिछान्यात…” चेतन भगत यांचं उर्फी जावेदबाबत गंभीर वक्तव्य