scorecardresearch

“बच्चू कडू यांचा संयम सुटला”; कार्यकर्ता मारहाण प्रकरणावरुन नवनीत राणांची टीका

अलीकडेच बच्चू कडू यांनी एका कार्यकर्त्यावर हात उगारल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे

“बच्चू कडू यांचा संयम सुटला”; कार्यकर्ता मारहाण प्रकरणावरुन नवनीत राणांची टीका
नवनीत राणांचा बच्चू कडूंवर निशाणा

प्रहार संघटनेचे प्रमुख व माजी मंत्री बच्चू कडू यांनी कार्यकर्त्याला मारहाण केल्याने त्यांचा संयम सुटल्याचे स्पष्ट होते, अशी टीका अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी येथे माध्यम प्रतिनिधींशी बोलताना केली. राणा नागपुरात बोलत होत्या. बच्चू कडू यांनी आपल्या कार्यकर्त्यावर जाहीरपणे हात उगारल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. या कृतीमुळे बच्चू कडू यांच्यावर विविध स्तरातून टीकाही होत आहे. 

हेही वाचा- गडचिरोली : आमच्या समाजात ‘असे’ अनेक महंत आहेत – मंत्री संजय राठोड

अलीकडेच बच्चू कडू यांनी एका कार्यकर्त्यावर हात उगारल्याची चित्रफीत प्रसारित झाली होती. तो संदर्भ देत राणा म्हणाल्या, नेत्यांचा कार्यकर्त्यांप्रती असा व्यवहार चुकीचा व त्याचा अपमान करणारा आहे. कार्यकर्त्यांमुळेच नेते मोठे होतात हे कडू यांनी विसरू नये. विशेष म्हणजे, यापूर्वी राणा यांचे आमदार पती रवी राणा व बच्चू कडू यांचा कलगीतुरा चांगलाच रंगला होता. 

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 01-10-2022 at 09:52 IST

संबंधित बातम्या