नागपूर : राज्यपाल तथा कुलपती रमेश बैस यांनी आज डॉ. विजय जनार्दन फुलारी यांची छत्रपती संभाजीनगर येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नियुक्ती केली. डॉ. विजय फुलारी हे शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथे वरिष्ठ प्राध्यापक असून ते भौतिकशास्त्र विभागाचे प्रमुख होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राज्यपालांनी नागपूर येथील सी पी अँड बेरार महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ मिलिंद अरविंद बारहाते यांची संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या कुलगुरूपदी नियुक्ती केली आहे. त्यांच्या नियुक्तीने पुन्हा एकदा नागपूरचा डंका वाजला आहे. मुंबईचे एसएनडीटी विद्यापीठ, नागपूर विद्यापीठ, औरंगाबाद विद्यापीठ आणि त्यानंतर आता अमरावती विद्यापीठामध्येही नागपूरने कुलगुरू दिले आहेत.

हेही वाचा – प्रेयसीवर चाकूने सपासप वार अन् प्रियकरानेही गळा कापून घेतला, अकोला जिल्ह्यातील धक्कादायक घटना

हेही वाचा – वाशिम : ७६ कोटी खर्च तरीही, मागास वस्त्या भकासच?

डॉ. बारहाते सुमारे बारा वर्षांपासून सी.पी. ॲण्ड बेरार महाविद्यालयाचे प्राचार्य आहेत. याआधी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेवर राज्यपाल नामनिर्देशित सदस्य म्हणूनही त्यांनी काम केले आहे. नागपूर युनिव्हर्सिटी टीचर्स असोसिएशनचे नेते डॉ. अरविंद बारहाते यांचे डॉ. मिलिंद बारहाते हे सुपुत्र आहेत. डॉ. अरविंद बारहाते हे अनेक वर्षे विद्यापीठाच्या विविध प्राधिकरणांवर सदस्य होते. मुंबईच्या एसएनडीटी विद्यापीठामध्ये नागपूरच्या डॉ. उज्ज्वला चक्रदेव कुलगुरू आहेत. तर नागपूर विद्यापीठाचे डॉ. सुभाष चौधरी यांची अडीच वर्षांआधी निवड झाली. औरंगाबाद विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून नागपूरकर डॉ. प्रमोद येवले नुकतेच निवृत्त झाले. राज्यातील अनेक विद्यापीठांवरही मागील दहा वर्षांत नागपूरच्या व्यक्तींची कुलगुरूपदी निवड झाली आहे. त्यात आता डॉ. बारहाते यांच्या रुपाने भर पडली आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: See how many vice chancellors of nagpur are there in maharashtra dag 87 ssb