लोकसत्ता टीम

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बुलढाणा: संभाजी भिडे यांच्या बेताल वक्तव्याच्या निषेधार्थ काँग्रेस तर्फे आज दुपारी आयोजित आंदोलनाला वेगळे वळण लागले. आंदोलन सुरू असतानाच एसटी बसवर दगड फेक करण्यात आली.

यानंतर बोलताना जिल्हाध्यक्ष राहुल बोन्द्रे यांनी आम्ही भिडे यांना जिल्ह्यात पाय ठेऊ देणार नाही. महापुरुष विरोधात बेताल वक्तव्य करणाऱ्या भिडे यांची सभा उद्या सोमवारी खामगाव येथे होणार आहे. यापार्श्वभूमीवर बोन्द्रे यांनी हा इशारा दिल्याने जिल्ह्यात वातावरण पेटण्याची व भिडेंची सभा वादळापूर्वीची शांतता समजली जात आहे.

आणखी वाचा-भिडे गुरूजींचा अपमान सहन करणार नाही- खासदार अनिल बोंडे

स्थानिय जयस्तंभ चौकात दुपारी तीन वाजता काँग्रेसच्या निदर्शनं व निषेध आंदोलन सुरु झाले. नेते निषेधाच्या घोषणा देत असतानाच एका कार्यकर्त्याने मलकापूर कडे जाणाऱ्या एमएच ४० एन ९८९१ क्रमांक च्या बसवर दगड भिरकावला, यामुळे बसचे समोरील काच तडकले. कार्यकर्त्याला बुलडाणा पोलिसांनी लगेच ताब्यात घेतले. दुसरीकडे यावेळी भिडे विरोधात घणाघाती घोषणा देण्यात आल्या. राहुल बोन्द्रे यांनी उध्या भिडे याला जीख्यात पाय ठेवू देणार नाही असा इशारा दिला. आंदोलनात हर्षवर्धन सपकाळ, संजय राठोड, संतोष आंबेकर, लक्ष्मण घुमरे, श्याम उमाळकर ,रवी पाटील आदी सहभागी झाले

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Stones pelted on bus in anti bhide movement of congress scm 61 mrj