लोकसत्ता टीम

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नागपूर: दोन कार आणि बुलेटसह मित्रांचा एक गट रविवारी सकाळी १० वाजता फुटाळा तलाव परिसरात आला आणि त्यांनी मौजमस्ती करण्यासाठी रस्त्यावरच कारची ‘रेस’ आणि ‘स्टंजबाजी’ करण्यास सुरुवात केली.

रस्त्यावरील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. त्यामुळे एका नागरिकाने पोलीस नियंत्रण कक्षाला फोन करून माहिती दिली. ‘स्टंटबाजी’ करणाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आणि वाहनेही जप्त केली. रविवारी सकाळी १० वाजता फुटाळा परिसरात ही घटनी घडली.

https://www.loksatta.com/wp-content/uploads/2023/06/car-race.mp4
व्हिडीओ सौजन्य- नागपूर सिटी पोलीस, Instagram

हेही वाचा… वर्धा: भरधाव ट्रक दुभाजकास धडकला अन् आग लागून भडकला

कोणतीही अनुचित घटना होऊ नये म्हणून गिट्टीखदान पोलीस तत्काळ घटनास्थळाकडे रवाना झाले. यादरम्यान कारचालक फुटाळ्यावर स्टंटबाजी करीत होते. काळ्या आणि पांढऱ्या रंगाच्या कारमध्ये बसलेल्या युवकांनी ‘रेस’ लावली. भरधाव वाहन पळवत रस्त्याने निघाले. रस्त्याच्या मधोमध कार थांबवून जोर-जोरात ‘हॉर्न’ वाजवल्यानंतर पुन्हा भरधाव वाहन पळवले.

हेही वाचा… चंद्रपूर : नऊ महिन्यांत १० लक्ष २६ हजार ज्येष्ठ नागरिकांनी केला लालपरीने मोफत प्रवास

लोकांच्या जीवाची पर्वा न करता निष्काळजीपणे ‘यू-टर्न’ घेत होते. त्याचे ‘इंस्टाग्रामवर’ प्रसारण करणेही त्याचवेळी सुरू होते. या स्टंटबाजीची चित्रफीत समाजमाध्यमांवर प्रसारित झाली. दरम्यान, पोलीस घटनास्थळी पोहोचले. मात्र, तोपर्यंत स्टंटबाज फरार झाले. गिट्टीखदान पोलीस ठाण्याचे ठाणेदार बापू ढेरे यांना चित्रफितीबाबत माहिती मिळताच वाहनाच्या नोंदणी क्रमांकावरून तीनही वाहनांचा शोध लावला. त्या तरुणांच्या घरी पोहोचून त्यांची वाहने जप्त केली. मोटार वाहन कायद्यानुसार गुन्हा नोंदवण्यात आला.

हेही वाचा… पूर्व विदर्भातील सर्वाधिक ‘डेंग्यू’ग्रस्त नागपूर जिल्ह्यात; गोंदिया, गडचिरोलीतही रुग्णवाढ

एका कारमध्ये पाच युवक तर दुसऱ्या कारमध्ये तीन युवक होते. पाचपैकी तिघांना घरून ताब्यात घेतले आणि ठाण्यात आणले. आई-वडील आणि वाहन मालकांना ठाण्यात बोलावले. सर्वांच्या पालकांना समज दिल्यानंतर पोलिसांनी तरुणांना सोडले. मात्र त्यांचे वाहन जप्तच ठेवले आहेत. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच वाहन सोडण्यात येणार आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Stunts by youths with speeding cars in futala area nagpur adk 83 dvr