वर्धा : वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा वर्धा जिल्ह्यात कायम लोभ राहला. या जिल्ह्याचे पालक मंत्रिपद ते हक्काने मागून घेतात, असे म्हटल्या जाते. नव्याने पालकमंत्री झाल्यावर ते प्रथमच वर्धा दौऱ्यावर आले तेव्हा त्यांचे जल्लोषात स्वागत झाले.विश्रामगृहावर त्यांनी पदाधिकाऱ्यांशी मनमोकळा संवाद साधला.जिल्ह्यात चोवीस कॅरेट दर्जाचे कार्यकर्ते आहेत.

वर्धा लोकसभा तसेच चारपैकी तीन विधानसभा मतदारसंघात त्यांनी पक्षाचा झेंडा फडकावला.येणाऱ्या निवडणुकीत चारही जागा जिंकून निवडणुकीची परीक्षा १०० टक्के गुण घेत उत्तीर्ण करायची आहे. सर्व घटकांना सोबत घ्या. आपल्या वागणुकीतून दुरावा निर्माण होणार नाही, याची काळजी घ्यावी असा सल्ला पण त्यांनी दिला. आमदार डॉ.पंकज भोयर, खासदार रामदास तडस, दादाराव केचे, जिल्हाध्यक्ष सुनील गफाट, सुमित वानखेडे, राजेश बाकाने व अन्य हजर होते.रात्री दहा पर्यंत त्यांनी भेटीगाठी घेतच वर्धा सोडले.