बुलढाणा : आजवरच्या सेवेत ढिगाने तक्रारी स्वीकारणारे बुलढाणा ठाणेदार प्रल्हाद काटकर, आज मात्र अजब तक्रारदारांच्या गजब तक्रारीने चक्रावून गेले! या तक्रारीद्वारे “आमचा चोरलेला पक्ष व धनुष्यबाण याचा तपास करून तो परत आणून द्या” अशी मागणी करण्यात आली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बुलढाणा तालुक्यातील ठाकरे गटाच्या निष्ठावान कार्यकर्त्यांनी आज थेट बुलढाणा शहर पोलीस ठाणे गाठून वरील मागणी करणारा तक्रार अर्ज दिला. यामुळे ठाणेदार व उपस्थित पोलीस अधिकारी-कर्मचारीदेखील चक्रावून गेले. या घडामोडीचा तपास कसा करावा, असा प्रश्न त्यांना पडला. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला शिवसेना पक्ष व धनुष्यबाण मिळाले आहे. याचा ठाकरे गटाकडून ठिकठिकाणी निषेध करण्यात येत असतानाच बुलढाणा तालुका शिवसेनेने या तक्रारीद्वारे निषेध केला.

छायाचित्र – लोकसत्ता टीम

हेही वाचा – नागपूर : मुलीला भेटायला आलेल्या प्रियकराला बघताच वडिलांचा संताप अनावर आणि..

हेही वाचा – नागपूर : बॅंकेतून काढलेली ९ लाखांची रक्कम भर दुपारी दुचाकीस्वारांनी पळवली

काय आहे तक्रारीत?

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी अनेक दशके संघर्ष करून शिवसेना उभी केली. हा पक्ष व धनुष्यबाण हा लाखो निष्ठावान शिवसैनिकांची अस्मिता आहे. भाजपाने शिंदे गटाला हाताशी धरून आयोगाला आमिष दाखवून हा पक्ष व चिन्ह चोरले आहे. आपण त्याचा तपास करून ते परत आणून द्यावे, अशी मागणी तक्रार अर्जातून करण्यात आली आहे. तालुका प्रमुख लखन गाडेकर यांनी ही तक्रार दिली आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Thackeray group workers in buldhana complaint regarding shivsena party and bow and arrow sign scm 61 ssb