अकोला : दक्षिण पश्चिम रेल्वे, बंगळुरू विभागातील बसमपल्ली रेल्वेस्थानक आणि श्री सत्यसाई प्रशांती निलयम दरम्यान तांत्रिक दुरुस्तीच्या कामासाठी प्रस्तावित ‘ब्लॉक’मुळे अकोला मार्गे धावणाऱ्या दोन गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांना चांगलाच मनस्तापाचा सामना करावा लागणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा – अकोला : अत्याचार पीडित १४ वर्षीय बालिका गर्भवती, न्यायालयाच्या आदेशाने…

हेही वाचा – वर्धा : चाईल्ड पोर्नोग्राफी! टेलिग्राम चॅनलवर प्रसारण करणाऱ्या विकृतास अटक

१० डिसेंबर ते ४ फेब्रुवारी डॉ. आंबेडकर नगर येथून सुटणारी १९३०१ डॉ. आंबेडकर नगर-यशवंतपूर साप्ताहिक एक्सप्रेसच्या ९ फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. ही गाडी उज्जैन, इटारसी, न्यू अमरावती, अकोला, पूर्णा, काचीगुडा मार्गे धावते. १२ डिसेंबर ते ६ फेब्रुवारी यशवंतपूर येथून सुटणारी १९३०२ यशवंतपूर- डॉ. आंबेडकर नगर साप्ताहिक एक्सप्रेसच्या नऊ फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. अकोला मार्गे इंदोर, बंगळुरूसाठी एकमेव रेल्वेगाडी दोन महिन्यांपर्यंत रद्द झाल्याने प्रवाशांना त्रास सहन करावा लागणार आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The train going to indore and bangalore was canceled for two months what is the reason ppd 88 ssb