लोकसत्ता टीम

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नागपूर: पुढील वर्षी महापालिकांसह लोकसभा निवडणुका होण्याची शक्यता लक्षात घेता केंद्रीय निवडणूक आयोगाने छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम जाहिर केला आहे. नोंदणीसाठी पात्र मतदारांनी त्यांची नावे नोंदवावी, असे आवाहन मतदार नोंदणी अधिकारी यांनी केले आहे.

मुख्य निवडणूक अधिकारी यांचेकडून १ जानेवारी २०२४ या अर्हता दिनांकावर आधारित मतदार यादीच्या संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार अर्हता दिनांकानुसार नोंदणीसाठी पात्र मतदारांना नाव नोंदणी करता येणार आहे. १ एप्रिल, १ जुलै आणि १ ऑक्टोबर या अर्हता दिनांकावर पात्र मतदाराच्या अर्जावर निवडणूक आयोगाच्या वेळापत्रकानुसार कार्यवाही केली जाणार आहे.

हेही वाचा… चंद्रपूर : कापसाच्या ‘कबड्डी’ आणि ‘पंगा’ वाणाची काळ्याबाजारात विक्री

एकीकृत प्रारुप मतदार यादी १७ ऑक्टोबर रोजी प्रसिध्द करण्यात येईल. दावे व हरकती १७ ऑक्टोबर ते ३० नोव्हेंबर पर्यंत स्वीकारण्याचा कालावधी आहे. २६ डिसेंबर २०२३ पर्यंत दावे व हरकती निकाली काढण्यात येतील. ५ जानेवारी रोजी मतदार यादी अंतिम प्रसिध्द करण्यात येईल, असे निवडणूक शाखेकडून कळवण्यात आले आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The work of voter list for the general election has started in nagpur cwb 76 dvr
First published on: 02-06-2023 at 18:45 IST