अमरावती : MSBSHSE Class 10th Result 2023 रिद्धी आणि सिद्धी या दोघी जुळ्या बहिणी, दोघीही दिसण्यामध्ये सारख्या, यामुळे सर्वजण गोंधळून जायचे. दोघीही एकाच शाळेत शिकणाऱ्या. त्‍यांनी दहावीच्‍या गुणातही जुळवून घेत ९६ टक्‍के गुण मिळवण्‍याची किमया साधली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

रिद्धी आणि सिद्धी यांच्‍या या अनोख्‍या सारखेपणाची चर्चा सध्‍या रंगली आहे. त्‍यांचे वडील प्रवीण लोखंडे हे मूळचे यवतमाळ जिल्ह्यातील बाभूळगाव तालुक्यातील कोठा फत्तेपूर येथील रहिवासी आहेत. मुलींच्या शिक्षणासाठी ते कुटुंबासह धामणगाव रेल्‍वे येथे राहतात. त्यांना तीन मुली आहेत. त्यात रिध्दी आणि सिध्दी या दोन जुळ्या मुली आहेत.

हेही वाचा >>> उद्या एमपीएससीची पूर्व परीक्षा; ११ हजार उमेदवार, काय आहे तयारी?

 गुरूवारी दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर रिद्धी आणि सिद्धी या दोघींनाही चांगले गुण मिळाल्‍याने लोखंडे कुटुंबीय आनंदित झाले. आश्चर्य म्हणजे दोघींनीही ९६ टक्के एकसारखे गुण मिळवून सर्वांनाच अचंबित केले. त्‍यांची आई कविता लोखंडे यांचे शिक्षण बी.ए.पर्यंत झाले आहे. तर वडील प्रवीण लोखंडे हे दहावी पर्यंत शिकलेले आहेत. मुलींनी उच्‍चशिक्षित व्‍हावे, ही त्‍यांची इच्‍छा आहे. रिद्धी-सिद्धीची मोठी बहिण समृद्धी ही अमरावतीत अभियांत्रिकीचे शिक्षण घेत आहे.

हेही वाचा >>> नागपूर : संतापजनक! चाॅकलेटचे आमिष दाखवून तीन वर्षाच्या मुलीवर बलात्कार

रिध्दी, सिध्दी या धामणगाव रेल्‍वे येथील हिराबाई गोयनका कन्या विद्यालयात दहावीला होत्या. दोघीही एकसारख्‍या दिसतात, त्‍यामुळे शेजारी, नातेवाईक अणि परिचितही गोंधळून जायचे.  अभ्यासातही त्‍या सारख्याच हुशार आहेत. निकाल जाहीर झाला तेव्हा दोघींना ४८० गुण मिळाले. दोघींचेही मुख्याध्यापिका सुनीता देशपांडे, शिक्षकवृंद यांच्यासह नातेवाईक आणि मित्र परिवारातून कौतुक होत आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Twin sisters have the same marks scored in class 10th mma 73 ysh