वाशिम : भारतीय जनता पक्षाकडून हिंदुत्वाच्या केवळ गप्पा मारल्या जातात. या भाजपाला शिवसेनाप्रमुखांनी हिंदुत्व शिकविले. भाजपाचे हिंदुत्व हे लोकांची घरे पेटविणारे असून शिवसेनेचे हिंदुत्व हे लोकांच्या चुली पेटविणारे आहे, अशी घणाघाती टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> रामदास तडस विजयाची हॅट्रिक करणार? भाजपाकडून वर्धेतून उमेदवारी जाहीर होताच गुलालाची उधळण

ते वाशीम येथे संवाद मेळाव्यात बोलत होते. कार्यक्रमाला विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, जिल्हा प्रमुख सुरेश मापारी, संपर्क प्रमुख सुधीर कवर, माजी मंत्री संजय देशमुख, माणिक देशमुख, आदींची उपस्थिती होती. उद्धव ठाकरे म्हणाले की, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी चुकीचा निर्णय दिला म्हणून आम्ही जनतेच्या न्यायालयात आलो. तुम्हीच सांगा शिवसेना कुणाची? त्यांनी आमचे वडील, पक्ष चोरला, पण माझी माणसं तुम्ही चोरू शकणार नाही. निवडणूक आयोगाचा अधिकार आम्ही मानणार नाही. शिवसेना नाव सोडणार नाही. ज्यांनी पक्षाशी गद्दारी गेली, त्या गद्दारताई, भाऊला घरी बसवा, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी जनतेला केले.

हेही वाचा >>> भाजपाने चंद्रपुरात भाकरी फिरवली! हंसराज अहीर यांच्याऐवजी सुधीर मुनगंटीवार यांना उमेदवारी

माजी मंत्री संजय देशमुख हेच ठाकरे गटाचे उमेदवार!

यावेळी उद्धव ठाकरे यांनी जाहीर सभेत माजीमंत्री संजय देशमुख यांचे नाव न घेता अप्रत्यक्षपणे उमेदवार जाहीर केला. आपला उमेदवार कोण हे तुम्हाला सांगायची गरज नाही, असे जाहीर करून आगामी निवडणुकीत पुन्हा शिवसेना ठाकरे गटाचा भगवा फडकवण्यासाठी तुमची साथ द्या, गद्दारांना घरी बसवा, असे आवाहन त्यांनी केले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ubt chief uddhav thackeray slams bjp over hindutva issue pbk 85 zws