वर्धा : वेगळा विदर्भ समितीचे अध्यक्ष वामनराव चटप यांच्या मार्गदर्शनाखाली सिंदखेडराजा ते नागपूर, अशी विदर्भ निर्माण यात्रा सुरू आहे. वेगळा विदर्भ का? यावर बोलताना चटप यांनी भाष्य केले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वामनराव चटप म्हणाले की, महाराष्ट्र दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर आहे. शेतकऱ्यांकडून अधिग्रहित केलेल्या जमिनीचा मोबदला देण्यासाठी एमएसआरडीसीला पासष्ट हजार कोटी रुपयांचे कर्ज उभे करायचे आहे. त्याला राज्य सरकारची थकहमी आहे. आधीच सहा लाख ६० हजार कोटींचे कर्ज, त्यात ही थकहमी व विविध जबाबदाऱ्या असणारे राज्य कधीच सक्षम होऊ शकत नाही. म्हणून विदर्भातील जनता शंभर वर्षे महाराष्ट्रात राहली तरी त्यांचा अनुशेष कधीच भरून निघू शकत नाही.

हेही वाचा – ज्ञानाच्या ‘पेटंट’ची गरज काय? डॉ. मोहन भागवत यांचा सवाल

हेही वाचा – विद्यार्थ्यांना अभ्यासात अडचण येऊ नये म्हणून मुस्लीम बांधवांकडून मशिदीवरील ध्वनिक्षेपक बंद

विदर्भ स्वतंत्र राज्य हाच पर्याय आहे. राज्यातील दोन हजार सातशे ओसाड गावांपैकी दोन हजार तीनशे गावं विदर्भातील असण्याची आकडेवारी चिंतनीय आहे. सरकार ‘छोटं कुटुंब, सुखी कुटुंब’ अशी घोषणा करते. मग छोटे राज्य सुखी राज्य का होऊ नये,असा सवाल चटप यांनी केला. काँग्रेस भाजपा हे विदर्भ विरोधी असून, ते कधीच स्वतंत्र विदर्भ होऊ देणार नाही, असे त्यांनी निक्षून सांगितले. माजी आमदार सरोज काशिकर, प्रभाकर कोंडबतूनवार, सतीश दाणी यांनीही मतं व्यक्त केली.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vamanrao chatap comment on vidarbha says vidarbha backlog will not be filled even in a hundred years in maharashtra which is going bankrupt pmd 64 ssb