लोकसत्ता टीम

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नागपूर: महाराष्ट्रामधील सर्वच मंदिरांमध्ये वस्त्र संहिता (ड्रेस कोड) लागू करण्याचा निर्णय महाराष्ट्र मंदिर महासंघाने घेतला आहे. याबाबत सर्व धार्मिक संस्थानी जनजागृती करून अंमलबजावणीसाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी, विश्व हिंदू परिषदेने केली आहे.

विश्व हिंदू परिषदेचे महाराष्ट्र व गोवा प्रदेश मंत्री गोविंद शेंडे यांनी वस्त्र संहितेचे स्वागत केले व ती राज्यात सर्वच मंदिरात लागू करावी, यासाठी राज्य सरकारला लवकर निवेदन देणार असल्याचे सांगितले.

हेही वाचा… दक्षिण अमेरिकेत ‘जय शिवाजी’चा जयघोष घुमणार! कार्यक्रम काय?

नागपूर, अमरावतीसह राज्यातील काही मंदिरात वस्त्र संहिता लागू करण्यात आली आहे मात्र मोठ्या मंदिरातही ती लागू करावी यासाठी विश्व हिंदू परिषदेच्या अंतर्गत सर्व संस्था मंदिरांमध्ये जनजागृती व प्रबोधन करणार आहे. महाराष्ट्रातील अन्य लहान मोठ्या मंदिराच्या विश्वस्तानी असाच निर्णय घेऊन तो लागू करावा,असे आवाहन विश्व हिंदू परिषदेने केले आहे. दक्षिणेतील देवस्थानाप्रमाणे मंदिरात येणाऱ्या भक्तांसाठी वस्त्रे पुरवण्याची व्यवस्था मंदिर विश्वस्तानी करावी असे आवाहन परिषदेने केले आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vishwa hindu parishad supports maharashtra temple federation decision of dress code in temples of maharashtra vmb 67 dvr