लोकसत्ता टीम

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वर्धा: वर्धा शहरालगत बोगस बियाण्यांचा कारखाना आढळून आल्यानंतर चांगलीच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी कसून चौकशी होत असून विशेष तपास पथक स्थापन करण्यात आले आहे. कोठडीत असणारा मुख्य आरोपी राजू जयस्वाल याला त्याच्या गावी रेहकीला नेण्यात आले. त्याच्या रेहकीच्या शेतात ठाणेदार चंद्रशेखर चकाटे हे तपास करण्यासाठी शेतातील घराच्या मागच्या भागात पोहचले. तेव्हा ते थक्कच झाले.

कारण या ठिकाणी मोठ्या प्रमाणात विदेशी दारूचा साठा आढळून आला. ही विविध कंपनीची दारू मध्यप्रदेशात तयार झालेली आहे. या प्रकरणात आरोपी राजूचे वडील सुभाष जयस्वालवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

हेही वाचा… अमरावती: शिक्षण उपसंचालक कार्यालयातील लाचखोर वरिष्ठ लिपिक गजाआड

मुख्य आरोपी राजू जयस्वाल याने गुजरातमधील राजूभाई नामक व्यक्तीकडून बोगस बियाणे आणत ते ईथे चांगल्या कंपनीच्या नावाने विकण्याचा धंदा केला. या राजूभाईला अटक करण्यासाठी वर्धा पोलीस गुजरातला गेली आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Wardha police has gone to gujarat to arrest the accused in the case of illegal foreign liquor stock pmd 64 dvr