नागपूर : भारतीय रेल्वेच्या ६ हजार ११२ स्थानकांवर ‘वाय-फाय’सेवा पुरवत असलेल्या कंपनीकडे जगातील सर्वांत मोठे नेटवर्क आहे. ही कंपनी रेल्वे मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत आहे. या कंपनीची स्थापन सन २००० मध्ये करण्यात आली. रेलटेल प्रामुख्याने दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान सेवा प्रदान करते. या कंपनीने रेल्वे रुळाच्या समांतर ऑप्टिकल फायबर केबल्सचे विशाल नेटवर्क टाकले आहे. रेलटेल ब्रॉडबँड सेवांच्या विस्तारासह संपूर्ण भारतातील रेल्वेस्थानकांवर वाय-फाय सुविधा प्रदान करण्यासाठी देखील ओळखल्या जाते. रेलटेल स्मार्ट सिटी प्रकल्पांमध्ये सहभागी आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शहरी पायाभूत सुविधांच्या विकासात आणि सुरक्षिततेला हातभार लावण्याचे काम ही कंपनी करीत आहे. या कंपनीला नवरत्न’ दर्जा प्राप्त झाला आहे. हा दर्जा मिळवणारी सार्वजनिक क्षेत्रातील ही २२ वी कंपनी आहे. कंपनीला कोणता लाभ मिळणार नवरत्न दर्जा मिळाल्याने रेल टेलला अधिक स्वायत्तता आणि आर्थिक लवचिकता मिळणार आहे. त्यामुळे त्याच्या पायाभूत सुविधांचा विस्तार करण्यासाठी आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर व्यवसायाच्या संधींचा शोध घेण्यासाठी भांडवली खर्च वाढू शकणार आहे.

हे ही वाचा…नागपूर : परतीच्या पावसाचा मुक्काम लांबण्याची शक्यता ?

कंपनीचे नेटवर्क

सध्या या कंपनीकडे ६२ हजार किमीचे विस्तृत ऑप्टिकल फायबर नेटवर्क आहे. तसेच १,१०० दूरसंचार टॉवर्स आहेत. याशिवाय डेटा सेंटर सेवा, क्लाऊड सोल्युशन्स, एमपीएलएस व्हीपीएन, संरक्षा परिचालन आणि रेल्वे सिग्नलिंग प्रकल्पांचा समावेश आहे. त्यामुळे ही कंपनी भारताच्या दूरसंचार आणि आयटी पायाभूत सुविधांच्या विकासात एक महत्त्वपूर्ण भाग बनलेली आहे, अशी माहिती मध्य रेल्वे वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक अमन मित्तल यांनी दिली.

रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि. हा भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम आहे. भारतीय रेल्वेच्या ६ हजार ११२ स्थानकांवर ‘वाय-फाय’ सेवा पुरवत असलेल्या रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि.ला प्रतिष्ठित नवरत्न दर्जा प्राप्त झाला आहे. हा दर्जा मिळवणारा सार्वजनिक क्षेत्रातील हा २२ वा उपक्रम ठरला आहे.

हे ही वाचा…नागपूर : ‘पुन्हा नक्षलवाद पेटणार’ची घोषणा दिली , न्यायालयाचा अटकपूर्व जामीन….

“भारतीय रेल्वेला सेवा प्रदान करणाऱ्या रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि.ला नवरत्न दर्जा मिळाल्याने या कंपनीला अधिक स्वायत्तता आणि आर्थिक लवचिकता उपलब्ध होणार आहे. त्यामुळे पायाभूत सुविधांचा विस्तार करण्यासाठी आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर व्यवसायाच्या संधींचा शोध घेण्यासाठी भांडवली खर्च वाढू शकणार आहे. “- अमन मित्तल, वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक, मध्य रेल्वे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: What is navratna which provides wi fi service at 6112 railway stations across the country rbt 74 sud 02