Premium

नाशिक: आगीत घरातील सर्व साहित्य खाक; सिडकोतील घटना

आगीत घरातील टीव्ही, गादी, फर्निचर, कपाट आदी साहित्य जळून भस्मसात झाले.

materials destroyed fire broke out house Torna Nagar CIDCO nashik
आगीत घरातील सर्व साहित्य खाक; सिडकोतील घटना (छायाचित्र- लोकसत्ता टीम)

नाशिक: सिडकोतील तोरणा नगरात उर्दू शाळेमागे असलेल्या एका घराला शनिवारी दुपारी आग लागल्याने संसारोपयोगी साहित्य खाक झाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

तोरणा नगरातील चौथ्या योजनेत गोकुळ खैरनार कुटूंबियांसह राहतात. शनिवारी ते कुटूंबातील सदस्यांसह काही कामानिमित्त बाहेर गेले होते. घरात पती-पत्नी, आई, दोन मुलगे असा परिवार आहे. दुपारी सव्वा बाराच्या सुमारास घरातून धूर निघू लागल्यावर परिसरातील नागरिकांनी अग्निशमन विभागाला माहिती कळवताच अग्निशमन दलाचा बंब घटनास्थळी दाखल झाला.

हेही वाचा… अवकाळीमुळे धुळे जिल्ह्यात २४२ हेक्टर पिकांचे नुकसान; ६२ गावे बाधित

गल्लीबोळातून घटनास्थळी पोहोचण्यास त्यांचा वेळ गेला. अवघ्या १५ मिनिटात अग्निशमन दलाने आग विझवली. तत्पूर्वी विद्युत विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत घरातील वीज पुरवठा बंद केला होता. आगीत घरातील टीव्ही, गादी, फर्निचर, कपाट आदी साहित्य जळून भस्मसात झाले.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: All the materials were destroyed by a fire that broke out in a house in torna nagar cidco nashik dvr

First published on: 02-12-2023 at 18:21 IST

आजचा ई-पेपर : नाशिक

वाचा