संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील मोहाडी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत भाजपचे गुजरात प्रदेशाध्यक्ष तथा मातब्बर खासदार सी. आर. पाटील यांची कन्या भाविनी पाटील विजयी झाल्या.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>>धुळे जिल्ह्यात दुपारपर्यंतच्या निकालात भाजप-शिंदे गटाचे वर्चस्व

मात्र त्यांच्या ग्रामविकास पॅनलचा दणदणीत पराभव झाला. यामुळे ग्रामविकास, वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांना हा मोठा धक्का मानला जात आहे.भाजपचे गुजरात प्रदेशाध्यक्ष सी. आर. पाटील यांची कन्या भाविनी पाटील विरुद्ध भाजपचेच जामनेरचे माजी उपनगराध्यक्ष शरद पाटील यांच्यात चुरशीची लढत झाली. या गावात भाजप विरुद्ध भाजप अशी थेट लढत झाली.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bhavini patil won the election of mohadi gram panchayat in jamner taluka of jalgaon district amy