नंदुरबार – तालुक्यातील ७५ पैकी ४१ ग्रामपंचायतींवर भाजप समर्थकांनी विजय मिळविला आहे. परंतु, दुधाळे येथील सरपंचपदाच्या निवडणुकीत भाजपचे आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांची पुतणी पराभूत झाल्याने गड आला आणि सिंह गेला अशी त्यांची अवस्था आहे. राज्यातील सत्तेत वाटेकरी असलेल्या शिंदे गट समर्थकांनी भाजपला कडवी झूंज देत २९ ग्रामपंचायतींमध्ये यश मिळविले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> Maharashtra News Live : राज्यातील महिला रामदास कदमांची जोड्याने पूजा करतील- भास्कर जाधव

हेही वाचा >>> नाशिक : प्रकल्प पळवापळवीतून मुंबई, महाराष्ट्राचे महत्व कमी करण्याचा डाव; छगन भुजबळ यांचा आरोप

तालुक्यातील चार ग्रामपंचायतींमध्ये राजकीय पक्षांना स्थान नाही. एका ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी समर्थकांचे वर्चस्व आहे.या निकालानंतर सत्तेचे दावे-प्रतिदावे होत असले तरी अनेक धक्कादायक निकालही लागले आहेत. आदिवासी विकास मंत्री डॉ. गावित यांची पुतणी आणि नंदुरबार पंचायत समितीचे सभापती प्रकाश गावित यांची मुलगी दुधाळे ग्रामपंचायतीत सरपंचपदाच्या स्पर्धेत पराभूत झाली. प्रतिक्षा वळवी यांना ५५९ तर शिंदे गटाच्या अश्विनी मालचे यांना ११०० मते मिळाली.

हेही वाचा >>> जळगाव : पावसामुळे कपाशी, सोयाबीन, मक्याचे नुकसान; जळगाव जिल्ह्यात बळीराजा संकटात

प्रतिष्ठेच्या धमडाई ग्रामपंचायतीत शिंदे गटाच्या चंद्रशेखर पाटील यांनी आपल्या सख्या भावांचा समावेश असलेल्या भाजपच्या पॅनलचा पराभव केला. याठिकाणी भावा भावामध्ये रंगलेली लढत चर्चेचा विषय होती. पंचायत समितीचे उपसभापती कमलेश महाले यांची आष्टे ग्रामपंचायत भाजपच्या ताब्यात गेली आहे, हवेलीमध्ये शिंदे गट समर्थकांनी सत्ता कायम ठेवल्याने नंदुरबार शहरालगतच्या वाघोदा, हवेली आणि दुधाळे या तीनही ग्रामपंचायतींमध्ये भाजप समर्थक विजयांपासून वंचित राहिले.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp supporters dominate 41 gram panchayats nandurbar taluka shinde group supporters also win ysh