शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यासाठी जळगाव जिल्ह्यातून २३० बसची नोंदणी | Dussehra melawa 2022 eknath shinde 230 msrtc busses jalgaon district mla kishore patil | Loksatta

शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यासाठी जळगाव जिल्ह्यातून २३० बसेसची नोंदणी

शिंदे गटाच्या मेळाव्याला २० हजारांपेक्षा अधिक कार्यकर्ते व पदाधिकारी जाणार असल्याची माहिती आमदार किशोर पाटील यांनी दिली.

शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यासाठी जळगाव जिल्ह्यातून २३० बसेसची नोंदणी
संग्रहित छायाचित्र /लोकसत्ता

जळगाव : शिवसेनेच्या फुटीनंतर मुंबईत बुधवारी उद्धव ठाकरे गट आणि एकनाथ शिंदे गट यांचा स्वतंत्र दसरा मेळावा होत आहे. जिल्ह्यातून शिंदे गटाच्या मेळाव्यासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या २३० बसगाड्यांची नोंदणी करण्यात आल्याचे विभाग नियंत्रक भगवान जगनोर यांनी सांगितले.मेळाव्याव्दारे शक्तिप्रदर्शनासाठी दोन्ही गटांकडून प्रयत्न केले जात आहेत. ठाकरे गटाच्या मेळाव्याला जिल्ह्यातून १० हजारांपेक्षा अधिक कार्यकर्ते व पदाधिकारी जाणार असल्याचे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे यांनी सांगितले. शिंदे गटाच्या मेळाव्याला २० हजारांपेक्षा अधिक कार्यकर्ते व पदाधिकारी जाणार असल्याची माहिती आमदार किशोर पाटील यांनी दिली.

मुंबईतील मेळाव्यांसाठी मंगळवारी दुपारनंतर कार्यकर्त्यांना घेऊन मुंबईकडे बस रवाना होऊ लागल्या. राज्यभरातील कार्यकर्ते व पदाधिकार्‍यांना मुंबईत येण्यासाठी महामंडळाच्या सुमारे चार हजार बसची नोंदणी करण्यात आली आहे. मुंबईतील महामंडळाच्या मध्यवर्ती कार्यालयाकडून या बसची नोंदणी झाली आहे. बसचे एकत्रित भाडेही मध्यवर्ती कार्यालयात जमा करण्यात आले आहे. मध्यवर्ती कार्यालयाकडून शिंदे गटाच्या जळगाव जिल्ह्यातील आमदारांच्या कार्यकर्त्यांसाठी २३० बस पुरविण्याचे आदेश दिले आहेत. यात पाचोरा-भडगाव, पारोळा-एरंडोल, चोपड्यासाठी बस पाठविण्यात येणार आहेत. मुंबईतील मेळावा झाल्यानंतर लगेच बस रात्री जळगावकडे परतणार असल्याचे महामंडळाच्या सूत्रांनी सांगितले.

हेही वाचा : नंदुरबारमध्ये पोलिसांकडून ८ लाखांची गांजा शेती उध्वस्त

मेळाव्यासाठी पाचोरा-भडगाव मतदारसंघातून शिंदे गटाचे १० हजार कार्यकर्ते जाणार आहेत. महामंडळाच्या बस, खाजगी मोटारींतून कार्यकर्ते रवाना होणार आहेत. काही रेल्वेतून जाणार असल्याचे आमदार किशोर पाटील यांनी सांगितले. जिल्ह्यातील ठाकरे गटाचे १० हजारांहून अधिक कार्यकर्त मेळाव्यात सहभागी होणार आहेत. मुंबईकडे पाच आक्टोबर रोजी जाणार्या रेल्वे गाड्यांमधील काही डबे आणि जागांसाठी नोंदणी करण्यात आली असल्याची माहिती जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे यांनी दिली.

मराठीतील सर्व नाशिक / उत्तर महाराष्ट्र ( Nashik ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
नंदुरबारमध्ये पोलिसांकडून ८ लाखांची गांजा शेती उध्वस्त

संबंधित बातम्या

जळगाव : यावल अभयारण्यात स्लेटी लेग्ड क्रेक पक्ष्याची नोंद; मध्य भारतातील ठरली पहिली नोंद
निवडणूक प्रचाराची नातेवाईकांवर भिस्त
युक्रेनबाबतच्या प्रश्नावर केंद्रीय मंत्री राणे भडकले

व्हिडिओ

ताज्या बातम्या
गर्भधारणा झाल्यानंतर ३ ते ४ दिवसांनी शरीरात दिसू लागतात ‘ही’ ५ लक्षणे; जाणून घ्या कसे ओळखावे
‘प्रत्येकाची बुद्धी असते, कोण काय बोलले याकडे मी लक्ष देत नाही’; उदयनराजेंचा शिवेंद्रराजेंना अप्रत्यक्षपणे टोला
हम साथ साथ है! शस्त्रक्रिया होताना लालू प्रसादांच्या पाठीशी संपूर्ण कुटुंब, मुलीने केली किडनी दान
VIDEO: ‘अपना एक स्टाईल है, इलाका तुम्हारा और धमाका हमारा’, मनसेच्या इशाऱ्यावर सुषमा अंधारेंचं प्रत्युत्तर, म्हणाल्या…
परेश रावल यांच्या अडचणीत वाढ; ‘या’ कलमांखाली गुन्हा दाखल