लोकसत्ता प्रतिनिधी

नाशिक: लग्नाचे नाटक करुन ३१ वर्षाच्या युवकाची चार संशयितांनी फसवणूक केली. या प्रकरणी मालेगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मालेगाव तालुक्यातील दाभाडी येथील पंकज कापडणीस (३१) यांची फसवणूक करण्यात आली. लग्नाच्या नावाखाली संशयितांनी अडीच लाख रुपये उकळले. एका युवतीशी लग्न लावून दिले. लग्नानंतर संशयित महिला ८० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने आणि कपाटात ठेवलेले १० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने घेवून फरार झाली. तसेच दुसऱ्या ठिकाणी जावून दुसऱ्या व्यक्तीशी लग्न केले. पोलिसांनी संशयित युवतीला ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी मालेगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे