Premium

धुळ्यात बनावट कागदपत्रांच्या आधारे भूखंड बळकावणारी टोळी; दोघांना अटक, आठ जणांविरुध्द गुन्हा

बनावट कागदपत्रांच्या आधारे मोक्याचे भूखंड परस्पर हडपणाऱ्या टोळीचे जाळे स्थानिक गुन्हे शाखेने उदध्वस्त केले.

Gangs grabbing plots based on fraud documents in Dhule two were arrested
धुळे शहरात बनावट कागदपत्रांच्या आधारे मोक्याचे भूखंड बळकावण्यचे प्रकार सुरु आहेत.(फोटो- प्रातिनिधिक छायाचित्र)

लोकसत्ता वार्ताहर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

धुळे : बनावट कागदपत्रांच्या आधारे मोक्याचे भूखंड परस्पर हडपणाऱ्या टोळीचे जाळे स्थानिक गुन्हे शाखेने उदध्वस्त केले. आठ जणाविरुध्द गुन्हा दाखल झाला असून त्यातील दोघांना अटक करण्यात आली आहे. जेबुनिशा मोहम्मद शफी (७०, रा. नर्वे मार्केट, रावतभाटा, चितोडगड, राजस्थान) यांच्या नावावर असलेल्या दोन भूखंडांची परस्पर विक्री केल्याची तक्रार त्यांचा मुलगा मोहम्मद शरीफ यांनी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्याकडे केली.

हा प्रकार गंभीर असल्याने धिवरे यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांना मूळ गुन्हेगारांना शोधण्याच्या सूचना केल्या. त्यानुसार निरीक्षक शिंदे यांनी भूखंड बळकावणाऱ्या टोळीचे जाळे उदध्वस्त केले. याबाबत पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी पत्रकार परिषदेत दिलेल्या माहितीनुसार, जेबुनिशा यांच्या नावावर देवपूर भागात दोन भूखंड होते. ते त्यांनी १९८७-८८ मध्ये खरेदी केले होते. भूखंड मालकांना अंधारात ठेवून अमोल मोरे आणि इरफान पटेल यांनी जेबुनिशा शफी यांच्या नावे बनावट आधार कार्ड व इतर कागदपत्रे तयार केली. त्याद्वारे दोन्ही भूखंडांची खरेदी-विक्री करण्यात आली. हा प्रकार ऑक्टोबर २०२० ते नोव्हेंबर २०२२ या कालावधीत घडला.

आणखी वाचा-नाशिकमध्ये प्लास्टिक वापर, कचरा प्रकरणी अडीच दिवसांत एक कारवाई; घन कचरा विभागाकडून ८१ हजारांची दंड वसुली

भूखंड व्यवहारासाठी जेबुनिशा यांच्या नावाने धुळे सहायक दुय्यम उपनिबंधक कार्यालयात तोतया महिलेला उभे करण्यात आले. सदर फसवणुकीचा प्रकार लक्षात आल्यानंतर शफी यांचा मुलगा मोहम्मद शफी (५२) यांनी तक्रार केली. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेने सखोल तपास करुन अमोल मोरे (रा.प्लॉट नं.१४९, संतसेना नगर, देवपूर, धुळे) आणि इरफान पटेल (देवपूर, धुळे) यांना अटक केली. या दोघांसह शेख अजीज (रा.गल्ली नंबर सात, मोहमदी नगर, देवपूर), बिलकीसबी शेख (रा.अंबिकानगर, देवपूर), रईस शेख (रा.गौसिया मजीद, गल्ली नंबर एक, देवपूर), रामचंद्र अहिरे (रा. वरखेडे रोड, जुने धुळे), सुशील जैन (रा.अंचाळे, ता.धुळे), तसेच आंबेडकर चौकात रहाणाऱ्या तोतया महिलेविरूद्ध शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आणखी वाचा-माळेदुमाला आदिवासी सहकारी संस्थेत अडीच कोटींचा अपहार, तिघांविरोधात गुन्हा

पोलीस अधीक्षकांचे आवाहन

धुळे शहरात बनावट कागदपत्रांच्या आधारे मोक्याचे भूखंड बळकावण्यचे प्रकार सुरु असून त्यात काही टोळ्या कार्यरत आहेत. याबाबत कोणाची तक्रार असल्यास त्यांनी न घाबरता पुढे यावे. बनावट महिलांना उभे करुन भूखंड हडपणार्या टोळ्यांविरुध्द कठोर कारवाई केली जाईल, असे आवाहन पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी केले आहे.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Gangs grabbing plots based on fraud documents in dhule two were arrested mrj

First published on: 08-12-2023 at 14:27 IST

आजचा ई-पेपर : नाशिक

वाचा