लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

नाशिक – शहरात अनेक भागात सार्वजनिक ठिकाणी कचरा फेकला जातो. प्रतिबंध असूनही कचरा जाळणारे कमी नाहीत. प्रतिबंधित प्लास्टिक पिशव्यांचा व्यावासायिक राजरोसपणे वापर करतात. प्रभावी कारवाई होत नसल्याने हे धारिष्ट्य दाखविले जाते, असा काहींचा आक्षेप आहे. या घटनाक्रमात नाशिक पूर्व विभागात एक नोव्हेंबर ते सात डिसेंबर या ३७ दिवसांत १४ ठिकाणी कारवाई करुन ८१ हजार ६०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. याचा विचार केल्यास घनकचरा व्यवस्थापन विभाग शहरातील एका विभागात अडीच दिवसांत एक कारवाई करत असल्याचे उघड झाले आहे.

Pune, heavy rain, Regional Transport Office, vehicle tests, Vehicle Aptitude Certificate, Learner s Driving Permit, Permanent License, Dive Test Ground, Alandi Road Test Ground, schedule change, marathi news
पुणे : पावसामुळे आरटीओच्या कामकाजावर पाणी! जाणून घ्या लायसन्ससह इतर चाचण्यांचे बदललेले वेळापत्रक…
Extension for registration of Engineering MBA Agriculture MCA courses Mumbai
अभियांत्रिकी, एमबीए, कृषी एमसीए अभ्यासक्रमांच्या नोंदणीसाठी मुदतवाढ
companies in andhra pradesh boom in stock market after budget declare
Budget 2024 : आंध्र प्रदेशमधील कंपन्यांना बाजारात झळाळी
Why is the youth of the state displeased with the contractual recruitment for government posts
शासकीय पदांसाठी कंत्राटी भरतीवरून राज्यातील युवकांमध्ये नाराजी का?
nashik electric charging stations marathi news
इलेक्ट्रिक वाहनांसाठी चार्जिंग केंद्रांचा विस्तार, नाशिक शहरात आणखी नऊ केंद्रांना मान्यता
primary health center in igatpuri taluka ranks first
सुश्रुत प्रणालीमध्ये वाडीवऱ्हे प्राथमिक आरोग्य केंद्र राज्यात प्रथम
health systems, Pune, laxity, health,
शहरबात : आरोग्य यंत्रणांमध्ये सुस्तावलेपणाची साथ
pravasi raja din, ST bus, passengers,
एसटी बस प्रवाशांच्या तक्रारी, समस्या ऐकल्या जाणार? काय आहे ‘प्रवासी राजा दिन’ उपक्रम जाणून घ्या…

महानगरपालिकेच्या नाशिक पूर्व विभागीय कार्यालयाने प्रतिबंधित प्लास्टिक विक्री विरोधात आणि सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला. कारवाईची संख्या पाहता विभागाच्या कामाचा वेग लक्षात येतो. मागील ३७ दिवसांच्या काळात या विभागात घनकचरा विभागाने १४ ठिकाणी कारवाई केली. यात प्रतिबंधित प्लास्टिकचा वापर केल्याची जवळपास निम्मी म्हणजे सहा प्रकरणे आहेत. संबंधितांकडून ३० हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. सार्वजनिक ठिकाणी मोठ्या प्रमाणात कचरा टाकल्याचे केवळ एक प्रकरण आहे. संबंधिताला १० हजार रुपयांचा दंड ठोठावला गेला. पूर्व विभागात चार ठिकाणी कचरा जाळला जात असल्याचे आढळले. या चार प्रकरणात २० हजार रुपयांची दंड वसुली करण्यात आली. नंदिनी नदीपात्रात बांधकाम साहित्य (राडारोडा) टाकल्याच्या एका प्रकरणात १० हजार रुपयांची दंडात्मक कारवाई झाली. रस्त्यालगत मोठ्या प्रमाणात बांधकाम साहित्य टाकल्याच्या एका प्रकरणात तितकाच दंड केला गेल्याचे मनपाने म्हटले आहे.

आणखी वाचा-माळेदुमाला आदिवासी सहकारी संस्थेत अडीच कोटींचा अपहार, तिघांविरोधात गुन्हा

मनपाचे प्रशासक तथा आयुक्त डॉ. अशोक करंजकर यांच्या आदेशान्वये व घनकचरा व्यवस्थापन विभागाचे संचालक डॉ. आवेश पलोड यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. नाशिक पूर्वचे विभागीय अधिकारी राजाराम जाधव, विभागीय स्वच्छता निरीक्षक सुनील सिरसाट, स्वच्छता निरीक्षक अजयकुमार मोरे , स्वच्छता मुकादम गौतम पवार आदींच्या पथकाने ही कारवाई केली. प्रतिबंधित प्लास्टिक पिशव्यांचा वापर करू नये, असे आवाहन महापालिकेने वारंवार केले आहे. मात्र व्यावसायिक त्यांचा वापर करतात. तसे आढळल्यास कारवाई करण्याचे निर्देश घनकचरा व्यवस्थापन विभागाने दिले आहेत.