लोकसत्ता प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नाशिक : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातर्फे हिवाळी-२०२४ दुसऱ्या टप्प्यातील वैद्यकीय विद्याशाखेच्या द्वितीय वर्षाच्या फार्माकोलॉजी विषयाची लेखी परीक्षा १९ डिसेंबर रोजी घेण्यात येणार आहे.

विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक डॉ. संदीप कडू यांनी यासंदर्भातील माहिती दिली. वैद्यकीय विद्याशाखेच्या लेखी परीक्षेदरम्यान दोन डिसेंबर रोजी दुपार सत्रामध्ये आयोजित द्वितीय वर्ष एम.बी.बी.एस. अभ्यासक्रमाच्या फार्माकोलॉजी-१ विषयाची परीक्षा सुरु होण्याआधी तासभर आधी प्रश्नपत्रिका फुटल्याचा मेल विद्यापीठास प्राप्त झाला. या अनुषंगाने सखोल चौकशी करण्याची सूचना कुलगुरुंनी केली आहे. तसेच विद्यापीठाच्या परीक्षा मंडळाची बैठक घेऊन याबाबत कार्यवाही करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

आणखी वाचा-जळगाव जिल्ह्यातील मोटार अपघातात दाम्पत्याचा मृत्यू

परीक्षा मंडळाने निर्देशित केल्यानुसार कोणत्याही विद्यार्थ्यांवर अन्याय होऊ नये यासाठी वैद्यकीय विद्याशाखेच्या व्दितीय वर्षाच्या फार्माकोलॉजी विषयाची फेरपरीक्षा १९ डिसेंबर रोजी दुपारच्या सत्रात घेण्यात येणार आहे. याबाबत विद्यापीठ स्तरावर चौकशी समिती नेमण्यात येणार आहे. तसेच स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात येणार आहे. वैद्यकीय विद्याशाखेच्या व्दितीय वर्षातील विद्यार्थ्यांनी फार्माकोलॉजी-१ विषयाच्या परीक्षेच्या सुधारित तारखेची नोंद घ्यावी. असे आवाहन विद्यापीठातर्फे करण्यात आले आहे.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Health university changes pharmacology exam date mrj