नाशिक : जिल्ह्यातून दोन अल्पवयीन बालक, बालिकेचे अपहरण झाल्याच्या तक्रारी पोलीस ठाण्यात दाखल झाल्या असून याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सटाणा येथील जयश्री कडाळे यांचा मुलगा गणेश (११) हा शाळेत गेला असता कोणीतरी पळवून नेले. शाळेतून बराच वेळ झाला तरी गणेश घरी परत न आल्याने पालकांनी शोधाशोध केली असता हा प्रकार लक्षात आला. या प्रकरणी सटाणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुसरी घटना येवला तालुका पोलीस ठाण्यातंर्गत घडली.

हेही वाचा…नाशिक : लाच स्वीकारताना कारकुनास अटक

शंकर भवर यांची मुलगी कोमल (१७) हिला संशयिताने आमिष दाखवून पळवून नेले. या प्रकरणी येवला तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Multiple kidnapping cases of minors sparks concern in nashik police investigating psg