नाशिक – शिक्षण विभागाची मान्यता नसताना लासलगाव परिसरात शाळा सुरू असल्याचे उघड झाले. याबाबत गटशिक्षणाधिकाऱ्यांनी लासलगाव पोलीस ठाण्यात तक्रार केल्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लासलगांव येथील दि लासलगाव नॅशनल एज्युकेशन सोसायटी संचलित बी. आ. शेख उर्दू प्राथमिक शाळेचे अध्यक्ष आणि संचालकांनी बालकाचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा हक्क अधिनियम कायद्यानुसार शिक्षणाधिकारी यांची मान्यता नसतांना तसेच कोणताही युडायस क्रमांक मंजूर नसतांना बेकायदेशीररित्या शाळा सुरु ठेवली.
अनधिकृतपणे शाळा सुरु ठेवत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान केल्याचा ठपका ठेवण्यात आला. याप्रकरणी शाळेचे अध्यक्ष हारूण शेख यांच्यासह पाच जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.