नाशिक : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी ३४९ सराईत गुन्हेगारांना शहरातून २४ नोव्हेंबरपर्यंत हद्दपार करण्यात आले आहे. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी आणि शहर भयमुक्त होण्यासाठी कार्यवाही करण्यात येत आहे. १३ नोव्हेंबरपूर्वी अवैध धंदे करणाऱ्या ३८९ जणांविरुध्द हद्दपारीची कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर गुरुवारी ३४९ सराईत गुन्हेगारांवर हद्दपारीची कारवाई करण्यात आली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : नाशिक: धोकादायक पद्धतीने मालमोटार चालवून समाजमाध्यमांत प्रसिद्धीचा सोस अंगाशी

गुरुवारच्या कारवाईत आडगाव पोलीस ठाणे १३, पंचवटी २४, म्हसरूळ १२, मुंबई नाका ४२, सरकारवाडा २०, भद्रकाली ३२, गंगापूर ९, सातपूर २४, अंबड १७, इंदिरानगर २३, एमआयडीसी चुंचाळे ३३, उपनगर ३६, नाशिकरोड ४१, देवळाली कॅम्प २२ याप्रमाणे पोलीस ठाण्यांच्या हद्दीतून गुन्हेगारांना हद्दपार करण्यात आले.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nashik police prohibited 349 criminals ahead of vidhan sabha election 2024 css