गेल्या काही दिवसांपासून वनविभाग ॲक्शन मोड वर आहे. जिल्हात बिबट्याचा मुक्त संचार असतांना त्याची शिकार करत कातडीची तस्करी करणाऱ्यांची संख्या कमी नाही. वनविभाग याकडे बारकाईने लक्ष ठेवून आहे. वनविभागाच्या सर्तकतेमुळे महिनाभरात तिसऱ्यांदा बिबट्याच्या कातडीची होणारी तस्करी रोखण्यात यश आले आहे. नाशिक पश्चिम वनविभागाने केलेल्या कारवाईत चिंकाराचे शिंगे, निलगायीचे शिंगे, बिबट्या वन्य प्राण्यांची कातडी, संशयितांकडील भ्रमणध्वनी जप्त केले आहे. या प्रकरणी तीन संशयितांना वनविभागाने ताब्यात घेतले असून हे महाविद्यालयीन विद्यार्थी आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नाशिक पश्चिम वनविभागाच्या पथकाला बिबट्याच्या कातडीची तस्करी शहर परिसरात होणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार वनपरिक्षेत्र अधिकारी विवेक भदाणे व त्यांच्या सहकाऱ्यांनी सापळा रचला. शहरातील उच्चभ्रृ असलेल्या कॉलेज रोड वरील कृषी नगर परिसरातील सायकल सर्कल येथे हा सापळा रचला. या ठिकाणी तीन संशयित महाविद्यालयीन युवक वन्यजीवांच्या अवयवांची विक्री करतांना आढळले.

हेही वाचा : ग्रामपंचायत निवडणुकांमधील यश ही सरकारच्या कामाची पोचपावती – एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन

हे महाविद्यालयीन युवक असून त्यांच्या माध्यमातून ही तस्करी होत असल्याने वनविभाग अधिकारी, कर्मचारी चकित झाले. पथकाने केलेल्या कारवाईत बिबट्याची कातड, चिंकाराचे शिंगे दोन, निलगायीचे शिंगे दोन तसेच चार भ्रमणध्वनी संशयितांकडून ताब्यात घेण्यात आले आहे. संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणात अन्य काही व्यक्तींचा सहभाग असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vigilance of forest department foiled leopard skin smuggling scheme in nashik tmb 01