मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवाजी पार्कवर सुरू केलेला ऐतिहासिक दसरा मेळावा कोण घेणार यावरून वाद निर्माण झाला होता. आता या वादावर सुनावणी करताना मुंबई उच्च न्यायालयाने शिवसेनेच्या ठाकरे गटाला शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यास परवानगी दिली. न्यायालयाच्या या निर्णयानंतर शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून नवी मुंबईत मिठाई वाटून जल्लोष साजरा करण्यात आला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा- शिंदे गटाला धक्का! शिवसेनेच्या ठाकरे गटाला शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यास हायकोर्टाकडून परवानगी

मिठाई वाटून जल्लोष

४० आमदार सोबत घेत एकनाथ शिंदे हे शिवसेनेतून बाहेर पडले व यथावकाश भाजपाच्या मदतीने मुख्यमंत्री बनले. मात्र, आपण शिवसेना सोडली नसून आपलीच खरी शिवसेना असल्याचा दावा शिंदे गटाकडून करण्यात येत आहे. गेली ४० पेक्षा जास्त वर्ष शिवसेनेचा शिवाजी पार्क वर होणारा दसरा मेळाव्यावरही त्यांनी हक्क सांगितला. तशी तयारीही राज्यभर सुरू झाली. दरम्यान सेनेनेही शिवाजी पार्क मैदानावर आपलाच दसरा मेळावा होणार असल्याचा दावा केला. याबाबत दोन्ही गटांनी थेट न्यायालयाचा दरवाजा दरवाजा ठोठावला. मात्र, न्यायालयाकडून शिंदे गटाला जोरदार धक्का मिळाला आहे. न्यायालयाने उद्धव ठाकरे यांना मेळाव्याची परवानगी दिली. ही बातमी मिळताच नवी मुंबई शिवसेनेच्या वाशी येथील मध्यवर्ती कार्यालयावर शिवसैनिक जमले व त्यांनी मिठाई वाटून जल्लोष साजरा केला. हा सत्याचा विजय आहे. सर्वोच्च नायलायत गेले तरी आमचाच विजय होणार, अशी भावना शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष विठ्ठल मोरे यांनी व्यक्त केली. यावेळी संपर्क प्रमुख निलेश अप्पा पराडकर महिलाध्यक्ष रंजना अहिंत्रे अनेक माजी नगरसेवक व पदाधिकारी उपस्थित होते.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: After dasara melava allowed by high court shivsainiks celebrate victory in navi mumbai dpj