उरण : दसरा व नवरात्रोत्सवाच्या विसर्जनाच्या निमित्ताने बुधवारी (५)ते गुरुवार (६) ऑक्टोबर रोजी नवी मुंबईत जड(कंटेनर)वाहनांना प्रवास करण्यास वाहतूक विभागाने बंदी घातली आहे. त्यामुळे नवी मुंबईत जड वाहनांना २४ तासांची बंदी असणार आहे. त्याचप्रमाणे या दरम्यान मार्गावर वाहने उभी करण्यासही बंदी घालण्यात आली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> ‘विजय’ आणि ‘विराट’ एपीएमसीमध्ये दाखल, पार पडला लाँचिंग सोहळा

दसऱ्याच्या निमित्ताने नवी मुंबईत ठिकठिकाणी नऊ दिवस स्थापना करण्यात आलेल्या सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळाच्या देवींचे विसर्जन केले जाणार आहे. यावेळी मिरवणूका काढण्यात येणार आहेत.या दरम्यान वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून नवी मुंबई वाहतूक पोलिसांनी दक्षता म्हणून मुंबई, ठाणे तसेच नवी मुंबई परिसरातील मार्गावर वाहतूक कोंडी होऊ नये या करीता तिन्ही शहरातील हद्दीतून आत्यावशक सेवा वगळून जड वाहनांना प्रवेश करण्यास बंदी घातली आहे. त्याचप्रमाणे या कालावधीत कोणत्याही प्रकारची जड वाहने रस्त्यावर उभी करण्यात येऊ नयेत असेही आदेश काढले आहेत. या संदर्भात नवी मुंबईच्या वाहतूक पोलीस विभागाचे उपायुक्त पुरुषोत्तम कराड यांनी परिपत्रक काढले आहे.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ban on heavy traffic for 24 hours in navi mumbai on wednesday amy