उरण : रविवारी अचानकपणे निर्माण झालेल्या वादळीवाऱ्यामुळे समुद्रात तीन दिवसांपूर्वी खोल समुद्रात मासेमारी गेलेल्या बोटी अर्ध्या वरून परतल्या आहेत. दरम्यान मुंबई पासून काही अंतरावर उरण परिसरातील एक मासेमारी बोटी बुडाली असून यातील खलाशाना वाचविण्यात यश आले आहे. या हंगामात ही नववी वेळ असून वादळामुळे मासेमारांचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले आहे.
समुद्र खवळल्याने धोक्याचा इशारा देणारा बावटा लावण्यात आला आहे. त्यामुळे मासेमारीसाठी रवाना झालेल्या बोटींना माघारी परतावे लागले आहे. या फेरीसाठी बर्फ खर्च यातील २५० पेक्षा अधिक बोटी करंजा बंदरात तर १८० पेक्षा अधिक बोटींनी कोकणातील विविध बंदरात नांगर टाकला आहे. या वादळीवाऱ्यामुळे मासेमारीसाठी अर्ध्या समुद्रात गेलेल्या बोटी परत आल्या आहेत. त्यामुळे यासाठी खर्च करण्यात आलेल्या तीन लाखापेक्षा अधिकचा खर्च वाया गेला आहे. त्यामुळे या वादळीवाऱ्यानी मच्छिमारांचे नुकसान झाले आहे. तर दुसरीकडे उपवासाचे दिवस संपल्याने मासळीच्या मागणीत वाढ झाली आहे. उपवास व धार्मिक उत्सवामुळे मासे खाणाऱ्या खवय्यांची संख्या घसरली होती. त्यामुळे बाजारपेठेत दरही गडगडले होते. करंजा बंदरात येणाऱ्या मासळीला उठावच नव्हता. नवरात्री व दिवाळी नंतर पुन्हा खवय्ये माशांवर ताव मारण्यास सुरुवात केली होती.
पावसाळ्यात ६० दिवस मासेमारी बंद होती. १ ऑगस्टपासून पुन्हा हंगाम सुरू झाला. मात्र खराब हवामान, विविध वादळांमुळे हवामान विभागाने आठवेळा धोक्याचा इशारा दिला. किमान २०-२२ दिवस मासेमारी बंद ठेवावी लागली होती. यादरम्यान मासळीची आवक कमी झाल्याने भाव गगनाला भिडले होते.मच्छीमारांना फटका बाजारात मासळीला उठाव नाही याचा मच्छीमारांना चांगलाच फटका बसला आहे. त्यामुळे बाजारात विक्रीतून मिळणाऱ्या जास्त भावापेक्षा कमी भावाने पॅकिंग कंपन्यांना मासळी विकण्याची वेळ येथील मच्छीमारांवर येऊन ठेपली आहे. पूर्वपदावर येतील, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. मात्र तोपर्यंत ग्राहकांची प्रतीक्षा करावी लागणार आहे.
मासेमारी बंदचा मासळीच्या आवकीवर परिणाम : करंजा बंदरात दिवसाला २०० टना पेक्षा अधिक मासळीचा व्यवहार होत आहे. मात्र यात सध्या समुद्रातील बदलत्या वातावरणामुळे परिणाम झाला असून मासळीची विक्रीत ही घट झाली आहे.
मासेमारी व्यवसाय हा शेतकऱ्या सारखा बनला आहे. पीक आलं की नुकसान होत. त्याप्रमाणे नवीन मासळीचा हंगाम सुरू झाला की,वादळ येतो आता नवव्या वेळेला हे संकट मच्छिमारांवर आले आहे. त्यामुळे मच्छिमार आर्थिक संकटात आला असल्याची माहिती करंजा मच्छीमार संस्थेचे माजी उपाध्यक्ष व मासळी व्यावसायिक रमेश नाखवा यांनी दिली आहे.
