नवी मुंबई : हापूसचा हंगाम संपुष्टात येत असून मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत जुन्नर हापूस आंबा दाखल होत आहे. त्याचप्रमाणे आता जुन्नर केशर आंबा दाखल होण्यास सुरुवात झाली आहे. शुक्रवारी बाजारात १५ ते २५ बॉक्स दाखल झाले असून, ६० रुपये ते ९० रुपये प्रतिकिलो दराने विक्री होत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा – वाशीत महाराष्ट्र भवन लवकरच उभं राहणार – आमदार म्हात्रे 

यंदाच्या लहरी हवामानाचा फटका हापूसला बसलाच आहे, त्यामुळे यंदाचे उत्पादन अवघे १६ ते १८ टक्के होते. त्यामुळे बाजारातही हापूसची आवक रोडावली होती. हापूसचा हंगाम आता शेवटच्या टप्प्यात असून १० जूनपर्यंत हापूसची तुरळक आवक राहील. मात्र आता बाजारात जुन्नर हापूसचा हंगाम सुरू झाला आहे. त्याचबरोबर आता बाजारात जुन्नरचा केशर आंबाही दाखल होण्यास सुरुवात झाली असून, १० जूननंतर ही आवक वाढेल, असे मत व्यापाऱ्यांनी व्यक्त केले आहे. शुक्रवारी बाजारात १५ ते २५ बॉक्स दाखल झाले असून, प्रति किलो ६० ते ९० रुपये दराने विक्री झाली आहे.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Junnar keshar mangoes arrived in apmc ssb