नवी मुंबई : मराठा आरक्षणाची मागणी करीत मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली चलो मुंबईची हाक देण्यात आली. हा दिंडी मोर्चा लाखोंच्या संख्येने २० तारखेला मराठवाड्यातील जालना येथून निघाला असून सकाळी लोणावळा येथे धडकला , तर आता पनवेल येथे दुपारी व संध्याकाळ पर्यंत नवी मुंबईत येईल अशी अपेक्षा आहे. सुरुवातीला हा मोर्चा दुपारी बारा पर्यंत येईल असा अंदाज होता . मोर्चाला लोणावळा पर्यंत येण्यास उशीर झाला. त्यामुळे दुपार पर्यंत नवी मुंबईत येईल असे वाटत असताना आता संध्याकाळ होईल असा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा…Maratha Aarakshan Morcha : मराठा मोर्चा, बाहेर जाताय, तुमच्या शहरात आज वाहतूक बदल नक्की कुठे कसा आणि पर्यायी मार्ग काय आहेत?

मात्र असा उशीर झाल्याने सुविधा पुरविण्यास प्रशासनाला वेळ मिळाला. तसेच पहाटे पासून न्याहारी जेवण याची लगबग शांत झाली. आता स्वयंपाक निवांत पणे केला जात आहे. नवी मुंबईतील सर्वच बाजार समितीत असेच दृश्य दिसत आहे. बाराच्या सुमारास आमदार व माथाडी कामगार नेते शशिकांत शिंदे, कांदा बटाटा माजी संचालक अशोक वाळुंज, नवी मुंबई काँग्रेस अध्यक्ष अनिल कौशिक अशा नेत्यांचे स्थळ तयारी पाहणी सुरू आहे. आता मराठा मोर्चा कधीही आला तरी सर्व तयार आहे असा दावा आमदार शिंदे यांनी केला आहे. 

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maratha morcha of manoj jarange patil will reach in navi mumbai around evening psg