Premium

आज हार्बर रेल्वे मार्गावर मेगा ब्लॉक

हार्बर मार्गावरील प्रवाशांना ब्लॉक कालावधीत सकाळी १०.०० ते संध्याकाळी ६.०० वाजेपर्यंत मेन लाइन आणि पश्चिम रेल्वेवरून प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे.

Mega Block Harbour Railway Line today Sunday
आज हार्बर रेल्वे मार्गावर मेगा ब्लॉक (Photo- Financial Express)

नवी मुंबई: छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी ११.१६ ते दुपारी ४.४७ वाजेपर्यंत वाशी/बेलापूर/पनवेल करीता सुटणाऱ्या आणि वांद्रे/गोरेगाव येथे जाणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील सेवा सकाळी १०.४८ ते दुपारी ४.४३ वाजेपर्यंत बंद राहणार आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पनवेल/बेलापूर/वाशी येथून सकाळी ९.५३ ते दुपारी ३.२० पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससाठी सुटणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा आणि गोरेगाव/वांद्रे येथून सकाळी १०.४५ ते सायंकाळी ५.१३ पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससाठी सुटणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा बंद राहतील.

हेही वाचा… दोन महिलांना अमली पदार्थ तस्करीच्या आरोपाखाली अटक

तथापि, ब्लॉक कालावधीत पनवेल आणि कुर्ला (प्लॅटफॉर्म क्र. ८) दरम्यान २० मिनिटांच्या अंतराने विशेष सेवा चालवल्या जाणार असून
हार्बर मार्गावरील प्रवाशांना ब्लॉक कालावधीत सकाळी १०.०० ते संध्याकाळी ६.०० वाजेपर्यंत मेन लाइन आणि पश्चिम रेल्वेवरून प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Mega block on harbour railway line today sunday dvr

First published on: 03-12-2023 at 12:43 IST

आजचा ई-पेपर : नवी मुंबई

वाचा