नवी मुंबई : नवी मुंबई मनपा मुख्यालय आणि विभाग कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचारी यांच्या बदल्याचे आदेश देण्यात आले आहेत. या बदल्या सेवा जेष्ठतेनुसार केल्या गेल्या आहेत.नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या आदेशानव्ये प्रशासकीय आधिकारी या संवर्गातील आधिकारी यांची सहाय्यक आयुक्त या संवर्गात सेवा ज्येष्ठतेनुसार अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहे.

सामान्य प्रशासन विभागात असणारे उत्तम खरात यांची घणसोली विभाग आधिकारी पदी नियुक्ती करण्यात आली असून भांडार विभागामध्ये असणाऱ्या शिल्पा देशपांडे यांची परवाना विभागात बदली करण्यात आली आहे. मालमत्ता कर आकरणी विभागात असणारे नैनेश बदले यांची दिघा विभाग अधिकारी पदी नियुक्ती करण्यात आली असून स्थानिक संस्था कर विभागांमध्ये असणारे सुखदेव येडवे यांची वाशी विभाग कार्यालयात नियुक्ती करण्यात आली आहे.

परिमंडळ १ मध्ये असणारे अरुण पाटील यांची अतिक्रमण विभागात बदली करण्यात आली आहे. अलका महापुरकर यांची वाशी विभाग कार्यालयातून मालमत्ता कर आकरणी विभागात बदली करण्यात आली आहे. घणसोली विभाग कार्यालयात असणारे स्वरुपा परळीकर यांची सामान्य प्रशासन विभागात बदली करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे बेलापूर विभाग कार्यालयात असणारे विलास वाव्हाळ यांची निवडणूक विभागात बदली करण्यात आली.