Navi Mumbai Airoort Vs Noida Jewar Updates:  नवी मुंबई – भारत देश हा विविध वाहतुकीच्या विकासाच्या दृष्टीने विविध पाऊले उचलत आहे. यामध्ये विमानवाहतूक पायाभूत सुविधांच्या उभारणीत मोठ्या टप्प्यावर आहे. वाढती मागणी पुर्ण करणे, विद्यमान विमानतळांवरील गर्दी कमी करणे आणि प्रादेशिक विकासाला चालना देणे या उद्देशाने देशातील दोन महत्वाच्या ग्रीनफिल्ड विमानतळ प्रकल्प उभारणीकडे लक्ष आहे. यामध्ये नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळ (जेवर, दिल्ली एनसीआरसाठी) आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ ( मुंबई महानगर क्षेत्रासाठी) असणार आहेत. दोन्ही विमानतळांचे आकार, क्षमता आणि परिणामाच्या दृष्टीने ही विमानतळे ‘गेम-चेंजर’ ठरणार असल्याचे सांगितले जात आहे. जाणून घेऊया त्यांच्या वैशिष्ट्यांची, फरकांची आणि त्यांच्या उभारणीमुळे शहरे, प्रवासी आणि अर्थव्यवस्था यांच्यावर कसा परिणाम होणार.

१) नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ (NMIA)

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हे नवी मुंबईतील उलवे येथे आहे. जे दक्षिण मुंबईपासून सुमारे ३७ किमी अंतरावर

याचे एकूण क्षेत्रफळ १,१६० हेक्टर (सुमारे २,८६६ एकर) इतके आहे. यात टर्मिनल्स आणि धावपट्ट्या पाहता पहिल्या टप्प्यात एक संयुक्त टर्मिनल (देशांतर्गत + आंतरराष्ट्रीय) असणार आहेत. भविष्यातील आराखड्यानुसार ३,७०० मी x ६० मी अशा दोन समांतर “कोड F” धावपट्ट्या असणार आहेत. या विमानतळाची प्रवासी क्षमता ही  पहिल्या टप्प्यात दरवर्षी २ कोटी प्रवासी इतकी असणार आहे. संपूर्ण क्षमतेनंतर दरवर्षी ९ कोटी प्रवासी इतकी असेल.

मालवाहतूक क्षमता

ही क्षमता पहिल्या टप्प्यात ०.५ दशलक्ष मेट्रिक टन असेल तर संपूर्ण क्षमतेनंतर ती ३.२ ते ३.२५ दशलक्ष मेट्रिक टन इतकी असेल.  या विमानतळाची डिझाईन ही कमळ-प्रेरित वास्तुरचना आहे. तर, सुविधा ही ६६ चेक-इन काउंटर, २९ एरोब्रिज, स्वयंचलित बॅगेज प्रणाली, कॉन्टॅक्टलेस प्रक्रिया, स्मार्ट इन्फ्रास्ट्रक्चर असे आहेत.

शाश्वत वैशिष्ट्ये:

४७ मेगावॅट सौरऊर्जा क्षमता असणार आहे. विद्युत वाहनाधारित परिवहन आणि प्रगत जल पुनर्वापर प्रणाली असणार आहे.  पुढील टप्प्यांमध्ये नवीन टर्मिनल्स (T2–T4), दुसरी धावपट्टी आणि टर्मिनल्सना जोडणारी स्वयंचलित पीपल मूव्हर प्रणाली असा विस्तार आराखडा असेल. या प्रकल्पासाठी १९,६५० कोटी रूपये इतका खर्च झाला असून विमानतळाचा प्रारंभ पहिल्या टप्प्यात डिसेंबर २०२५ पर्यंत अपेक्षित आहे.

२)  जेवर / नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळ (NIA)

जेवर – नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळ हे उत्तर प्रदेश येथील गौतम बुद्ध नगर जेवर येथे आहे. ते दिल्ली विमानतळापासून सुमारे ७२ किमी, ग्रेटर नोएडापासून २८ किमी अंतरावर आहे. या विमानतळाचे एकूण क्षेत्रफळ ५,००० हेक्टर (पहिल्या टप्प्यामध्ये १,३३४ हेक्टरवर काम) आहे. याच्या धावपट्ट्या आणि टर्मिनल्स पहिल्या टप्प्यात दोन धावपट्ट्या; भविष्यात ५–६ धावपट्ट्यांचा आराखडा आहे. याची प्रवासी क्षमता पहिल्या टप्प्यात दरवर्षी १.२ कोटी प्रवासी इतकी तर पूर्ण क्षमतेनंतर दरवर्षी ७ ते ८ कोटी प्रवासी इतकी आहे.

मालवाहतूक:

मोठ्या प्रादेशिक मालवाहतूक आणि लॉजिस्टिक हबसाठी संरचना असून भावी टप्प्यांची आकडेवारी अद्याप अंतिम झालेली नाही

जोडणी सुविधा:

यमुना एक्सप्रेसवेवरील उत्कृष्ट जोडणी, येऊ घातलेली मेट्रो लिंक (IGI विमानतळापर्यंत), तसेच दिल्ली–मेरठ RRTS कॉरिडॉरचा भाग ही मुख्य जोडणी या विमानतळामुळे शक्य आहे.

शाश्वतता व संरचना :

ग्रीनफिल्ड, डिजिटल-फर्स्ट विमानतळ, सौर ऊर्जा आणि ऊर्जा कार्यक्षम रचना असलेले विमानतळ प्रकल्प आहे. 

या विमातळाचा प्रकल्प खर्च हा २९,००० ते ३०,००० कोटी रूपये इतका आहे.

विस्तार आराखडा:

भविष्यात ६ धावपट्ट्यांपर्यंत विस्तार, मोठ्या प्रमाणावर कार्गो टर्मिनल्स असणार असून बांधकामाधीन; टप्प्याटप्प्याने उद्घाटन लवकर होणे अपेक्षित आहे.

ही दोन्ही विमानतळे शहरांमध्ये कसा बदल घडवतील

गर्दी आणि क्षमता मर्यादा कमी करणे:

मुंबईचे विद्यमान छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ (CSMIA) प्रवासी व उड्डाण वाहतुकीमुळे ताणाखाली आहे. विस्तारासाठी मर्यादित जागा आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हे अतिरिक्त क्षमता उपलब्ध करून देईल. त्याचप्रमाणे, दिल्ली-एनसीआरमध्ये IGI विमानतळ आपली मर्यादा गाठत आहे. जेवर विमानतळ हे वाढत्या मागणीसाठी दुसरा मोठा प्रवेशद्वार ठरेल.

उत्तम जोडणी:

दोन्ही विमानतळांना बहुपद्धत जोडणी (एक्सप्रेसवे, मेट्रो/रेल्वे, रस्ते) मिळणार आहे. जेवरला यमुना एक्सप्रेस- वे, RRTS आणि मेट्रोसारख्या प्रकल्पांनी जोडले जाणार आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ देखील मुंबईच्या रस्ते, रेल्वे आणि वॉटर टॅक्सी नेटवर्कमध्ये महत्वाचे ठरणार आहे.

शहरी / प्रादेशिक विकास:

विमानतळे ही शहरी वाढीची केंद्रे ठरतात. दोन्ही विमानतळांच्या परिसरात निवासी प्रकल्प, औद्योगिक क्षेत्रे, लॉजिस्टिक पार्क, व्यावसायिक केंद्रे, हॉटेल्स आणि इतर सेवा उभारल्या जात आहेत. जेवर परिसरात रिअल इस्टेट आणि उद्योग गुंतवणूक वाढत आहे. तर, नवी मुंबईतही उलवे, पनवेलसारख्या भागांत मागणी आहे.

शाश्वतता आणि आधुनिक रचना:

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामध्ये सौरऊर्जा, जल पुनर्वापर, विद्युत वाहने यांसारखी ग्रीन वैशिष्ट्ये आहेत. जेवरही आधुनिक संरचनेसह उभा राहत आहे, जरी त्याच्या शाश्वततेच्या तपशीलांची माहिती मर्यादित आहे.

भारताच्या अर्थव्यवस्थेला होणारा फायदा

व्यापार आणि मालवाहतूक वाढ: नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळच्या ३ दशलक्ष टनांहून अधिक वार्षिक क्षमतेमुळे निर्यात-आयात वाढेल, लॉजिस्टिक अडथळे कमी होतील आणि पुरवठा साखळी अधिक सक्षम बनेल.

नोकऱ्या आणि गुंतवणूक: बांधकाम, संचालन, सेवा, हॉटेल्स, देखभाल यांमध्ये मोठ्या प्रमाणात थेट आणि अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती होईल. विमानतळाभोवतीच्या भागांमध्ये औद्योगिक आणि रिअल इस्टेट गुंतवणूक वाढेल.

प्रादेशिक विकास: विमानतळांभोवती रस्ते, वीज, पाणी, वाहतूक व्यवस्था सुधारते. त्यामुळे व्यवसाय आणि जीवनमान दोन्ही उंचावतात.

पर्यटन आणि जागतिक संपर्क: वाढीव आंतरराष्ट्रीय मार्ग, अधिक उड्डाणे आणि चांगला प्रवासी अनुभव यामुळे पर्यटन आणि व्यावसायिक प्रवास सुलभ होईल. ज्याचा फायदा हॉटेल, रिटेल आणि इतर क्षेत्रांना होईल.

हवाई प्रवास खर्च आणि वेळ कमी होणे: गर्दी कमी झाल्याने आणि स्पर्धा वाढल्याने उड्डाण विलंब आणि खर्च कमी होतील, कार्यक्षमतेत वाढ होईल.

पायाभूत सुविधांची मजबुती: अशा मोठ्या प्रकल्पांमुळे रस्ते, सार्वजनिक वाहतूक, ऊर्जा व पाणीपुरवठा या सर्व क्षेत्रांमध्ये सुधारणा होते. ज्याचा फायदा व्यापक जनतेला मिळतो.

प्रवाशांसाठी फायदे

अधिक पर्याय आणि कमी गर्दी: नव्या विमानतळ क्षमतेमुळे उड्डाणे कमी गर्दीची व वेळेत राहतील. मुंबईकरांसाठी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ वरील ताण कमी करेल. तर दिल्लीकरांसाठी जेवर हे IGI ला पर्याय देईल.

नवीन मार्ग आणि चांगली जोडणी: अधिक उड्डाण मार्ग उपलब्ध झाल्याने देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय नवीन मार्ग सुरू होऊ शकतात.

उत्तम प्रवासी अनुभव: आधुनिक टर्मिनल्स, स्वयंचलित प्रणाली, कॉन्टॅक्टलेस सुविधा, उत्तम डिझाईन व सोयी आहेत. उदाहरणार्थ, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामध्ये सेल्फ-बॅगेज ड्रॉप, आधुनिक बॅगेज हाताळणी इत्यादी सुविधा असतील.

कमी प्रवास वेळ: यमुना एक्सप्रेस – वे, RRTS, मेट्रो आणि मुंबईतील बहुपद्धत वाहतूक यामुळे दोन्ही विमानतळांपर्यंत पोहोचणे सुलभ होईल.

खर्चात संभाव्य बचत: दीर्घकालीन दृष्टीने स्पर्धेमुळे आणि कार्यक्षमतेमुळे उड्डाण आणि मालवाहतूक खर्चात घट होऊ शकते.

उपनगरांतील नागरिकांसाठी सोय: दोन्ही विमानतळ मुख्य शहरापासून काहीसे दूर असले तरी उत्कृष्ट जोडणीमुळे उपनगरातील नागरिकांसाठी अधिक सुलभ ठरतील.

सर्व गोष्टींचा विचार पाहता जेवर आणि नवी मुंबई ही दोन्ही विमानतळे भारताच्या विमानवाहतूक क्षेत्रातील पायाभूत प्रकल्प आहेत. दोन्हींचा उद्देश वाढती मागणी पूर्ण करणे आणि आर्थिक विकासाला चालना देणे हा आहे.