नवी मुंबई : लोकसभा निवडणूक प्रचार शिगेला पोहोचला असून कल्याण डोंबिवलीत  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा बुधवारी होणार आहे. सभा होणार असल्याने सुरक्षा कारणास्तव तसेच वाहतूक सुरळीत होण्याच्या दृष्टीने वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पाहुण्याच्या नवी मुंबई क्षेत्रातील वाहतूक बदल 

१५ तारखेला  (बुधवारी) पंतप्रधान,नरेंद्र मोदी, कल्याण कल्याण पश्चिम शहरात लोकसभा निवडणूक २०२४ चे अनुषंगाने कल्याण पश्चिम येथील व्हरटैक्स मैदान, आधारवाडी जेल चौक,  येथे प्रचार सभेच्या कार्यक्रमाकरीता उपस्थित राहणार आहेत. या वेळी ठाणे शहर परिसरात वाहतूक कोंडी होउ नये व परिसरातील वाहतूक सुरळीत व सुनिश्चित राहणे जनतेच्या सोईसाठी आवश्यक असल्याने पोलीस उप आयुक्त, वाहतुक विभाग ठाणे शहर यांनी वरिल संदर्भीय आदेशान्वये अधिसुचना निर्गमित केली आहे. त्या अनुषंगाने  महापे, नवी मुंबई, मार्गे शिळफाटा येथुन ठाण्याचे दिशेने जाणारी सर्व प्रकारच्या जड अवजड वाहनांना शिळफाटा येथे ‘प्रवेश बंद’ करण्यात आलेला आहे.

हेही वाचा…एपीएमसीत लिचीच्या हंगामाला सुरुवात

सदर कालावधीत महापे नवी मुंबई मार्गे शिळफाटा येथून ठाण्याचे दिशेने जाणारी सर्व प्रकारच्या जड अवजड वाहने ऐरोली मार्गे इच्छित स्थळी जातील, तसेच तळोजा नवी मुंबई येथून दहिसर मोरी मार्गे कल्याण फाटा येथील कल्याणच्या दिशेने जाणाऱ्या सर्व प्रकारच्या जड अवजड वाहनांना दहिसर मोरी मार्गे प्रवेश बंद करण्यात आलेला आहे. सदर मार्गावरील तळोजा नवी मुंबई, दहिसर मोरी येथून जाणारी सर्व प्रकारची जड अवजड वाहने पनवेल मार्गे इच्छित स्थळी जातील आणि नवी मुंबई, शिळफाटा, खोणी कडून नेवाळी नाका मार्गे कल्याणकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या जड अवजड वाहनांना नेवाळी नाका येथे प्रवेश बंद करण्यात येवून सदर मार्गावर वाहने नेवाळी नाका येथून अंबरनाथ, बदलापूर मार्गे इच्छित स्थळी जातील असे पर्यायी मार्ग दिलेले आहेत.

नवी मुंबई वाहतुक विभागाचे कार्यक्षेत्रातील सायन-पनवेल महामार्ग, ठाणे बेलापुर या दोन्ही मार्गावर काही ठिकाणी रस्त्यांची कामे सुरु आहेत. तसेच पुणे, कोकण, गोवा बाजूकडून मुंबई मध्ये ओघ मोठया प्रमाणात असल्यामुळे नवी मुंबई वाहतुक विभागाचे कार्यक्षेत्रातील वाहतुक सुरळीत व सुनिश्चित राहणे जनतेच्या सोयीसाठी आवश्यक आहे.

हेही वाचा…वादळवाऱ्यातील विजेच्या खोळंब्यामुळे पनवेलमधील मतदान केंद्रात मतदारांच्या रांगा

ही अधिसूचना बुधवारी रात्री १२ वाजल्यापासून पुढील चोवीस तास असणार आहे. या कालावधीत  नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचे हद्दीत सर्व प्रकारच्या जड अवजड, मालवाहतुक करणाऱ्या वाहनांना शहराचे सर्व मार्गावरुन मार्गस्थ होण्यास, प्रवेश करण्यास (ठाणे शहरातून मुलुंड-ऐरोली मार्गे नवी मुंबई मध्ये प्रवेश करणारी वाहने वगळून) आणि वाहने उभी (पार्क) करण्यास पूर्णतः बंदी राहील.  अशी माहिती पोलीस उपायुक्त तिरुपती काकडे यांनी दिली आहे. 

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pm narendra modi s public meeting in kalyan traffic changes implemented in navi mumbai psg