पनवेल: सोमवारी दुपारी झालेल्या अर्ध्या तासाच्या वादळीवाऱ्याच्या पावसाने पनवेल ग्रामीणमधील ४० गावांचा वीज पुरवठा बंद करण्यात आला. परंतू ज्यावेळेस वीज पुरवठा सुरू केला. त्यावेळेस तळोजा औद्योगिक वसाहतीमधील विजेच्या तारांवर झाड कोसळल्याने ग्रामीण पनवेलमधील धानसर, रोहिंजण, नावडे व इतर १५ गावांची वीज सायंकाळी पाच वाजेपर्यंत बंद ठेवावी लागली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वीज महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने विजेच्या तारांवर पडलेले झाड हटवून वीज पुरवठा पूर्ववत केला. मात्र तोपर्यंत मोबाईलच्या बॅटरीवरील लहान प्रकाशात पनवेलमधील ग्रामीण भागात मतदान केंद्रात मतदान संथगतीने सुरू होते. अखेर वादळीवाऱ्याचा जोरदार फटका पनवेलमधील शेकडो मतदान केंद्रावर पाहायला मिळाला.

हेही वाचा : निवडणूक आयोगाच्या आदेशानंतर कंपनीतील कामगारांना मतदानासाठी अर्ध्या दिवसाची सवलत

विजेअभावी मतदान कमी होऊ नये यासाठी धानसर गावातील शाळेच्या मतदान केंद्रावर पन्नासहून अधिक मतदारांना मतदान केंद्र प्रमुखांनी त्यांच्या मतदार यादीतील अनुक्रमांकानूसार मतपत्रिका दिल्यामुळे सायंकाळी साडेसहा वाजेपर्यंत या गावातील मतदार मतदान करत होते. विशेष म्हणजे निवडणूक आयोगाने मतदारांना मतदान केंद्रात मोबाईल फोन नेण्यास मज्जाव केला होता. मात्र अखेर मतदान केंद्रातील काळोख दूर करण्यासाठी त्याच मोबाईलफोनच्या बॅटरीचा प्रकाशात मतदान करण्याची वेळ निवडणूक यंत्रणेवर आली.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Queues of voters at polling station in panvel due to power outage during storm css