उरण : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बुधवारी उलवे येथील सुखकर्ता कार्यालयात जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत यांच्या मार्गदर्शनाखाली नुकत्याच नियुक्ती झालेल्या विधानसभा प्रभारी यांची बैठक पार पडली. या बैठकीला कर्जत, उरण, पेण, अलिबाग येथील पदाधिकारी उपस्थित होते.

महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस मिलिंद पाडगावकर यांनी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना आगामी काळात जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत यांच्याशी विचारविनिमय करून काॅंग्रेस पक्षाची विचारधारा तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी खंबीर भूमिका घ्यावी असे सांगितले.

यावेळी जिल्हाध्यक्ष घरत यांनी सर्वांना सोबत घेऊन काॅंग्रेस बळकट करण्यासाठी हातात हात घालून काम करण्याचे आवाहन केले. तर आगामी काळातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी तालुकाध्यक्ष आणि कार्यकर्त्यांनी कामाला लागावे. मी खंबीरपणे आपणा सर्वांच्या मागे आहे. नव्याने नियुक्ती झालेल्या सर्व पदाधिकारी यांना सहकार्य करायचे आहे.” या बैठकीत जिल्हाध्यक्ष घरत आढावा घेऊन पदाधिकारी यांची मते जाणून घेतली.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या आदेशावरून रायगड जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघासाठी विधानसभा प्रभारी म्हणून कर्जत – नारायण आंबेकर, सचिव. उरण– डॉमिनीक डीमेलो. सरचिटणीस. पेण – मनोज कांबळे, सरचिटणीस. अलिबाग – प्रदीप राव, सचिव. श्रीवर्धन – अशोक मोरे, सचिव. महाड – सुरेश कातकर (रत्नागिरी) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्याबद्दल जिल्हाध्यक्ष यांनी ‘परदेश प्रवासाची पंचविशी’ आणि ‘जय शिवराय’ ही पुस्तके भेट देऊन स्वागत केले.यावेळी वैभव पाटील, किरीट पाटील, तसेच जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते, ब्लॉक अध्यक्ष, प्रदेश पदाधिकारी व जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.