रविवारी दुपारी पावणेचार वाजण्याच्या दरम्यान शीव पनवेल मार्गावर भरधाव डंपर  ब्रेक फेल होऊन भीषण अपघात झाला. यात कोणी मृत झाले नसले तरी तब्बल ११ गाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तर दोन जण अंत्यवस्थ आहेत. डंपर चालक पळून गेला आहे त्याच्या विरोधात गुन्हा नोंदवण्याचे काम सुरु आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> उरणच्या ग्रामीण भागालाही कंटेनर वाहनांचा विळखा

रविवारी दुपारी साडेतीन पावणेचारच्या दरम्यान शीव पनवेल मार्गावर वाशी पथकर नाक्यानजीक एका डंपरचा (एमएच ४६ एएफ ६६९४) ब्रेक फेल झाला आणि या भरघाव डंपरने ११ पेक्षा अधिक गाड्यांना ठोस मारली. शेवटी खाडी आणि खाडी पुलाला लावण्यात आलेल्या सुरक्षा पत्र्याला धडकून डंपर थांबला. मात्र दुर्दैवाने याच ठिकाणी एका दुचाकी स्वाराला ठोकर मारली त्यात दुचाकीवर बसलेल्या दोघांची प्रकृती गंभीर असून त्यांना मनपा रुग्णालयात दाखल केले होते.  

हेही वाचा >>> नवी मुंबई : नवरात्र उत्सवात गरबा व दांडियासाठी रात्री १० पर्यंतची तर अष्टमी नवमीला १२ पर्यंतची वेळ

मुंबई पुणे मार्गिकेवर झालेल्या या अपघातानंतर डंपर चालक पळून गेला आहे, मात्र त्याच्या मदतनीसाला ताब्यात घेण्यात आले आहे.अपघात झाल्या नंतर मानखुर्द नजीक पर्यत वाहनांच्या रांगा गेल्या होत्या. संध्याकाळी साडे पाच नंतर वाहतूक पूर्ववत झाली.  ५ गाड्या टोइंग गाडी वापरून बाजूला करण्यात आल्या तर काही धक्का मारून रस्त्याच्या कडेला करण्यात आल्या ७ गाड्यांचे  मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे तर अंदाजे पाच गाड्यांचे किरकोळ नुकसान झाले आहे. यात एका दुचाकीवरील दोघांना गंभीर दुखापत झाल्या आहेत. अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक भानुदास देशमुख यांनी दिली. 

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shiv panvel vashi pathkar terrible accident amy