नवी मुंबई : डंपर ब्रेक फेल - २ ,गंभीर जखमी ,११ गाड्यांचे नुकसान- शीव पनवेल वाशी पथकर भीषण अपघात | Shiv Panvel Vashi Pathkar Terrible Accident amy 95 | Loksatta

नवी मुंबई : डंपर ब्रेक फेल – २ ,गंभीर जखमी ,११ गाड्यांचे नुकसान- शीव पनवेल वाशी पथकर भीषण अपघात

रविवारी दुपारी पावणेचार वाजण्याच्या दरम्यान शीव पनवेल मार्गावर भरधाव डंपर  ब्रेक फेल होऊन भीषण अपघात झाला.

नवी मुंबई : डंपर ब्रेक फेल – २ ,गंभीर जखमी ,११ गाड्यांचे नुकसान- शीव पनवेल वाशी पथकर भीषण अपघात
रविवारी दुपारी पावणेचार वाजण्याच्या दरम्यान शीव पनवेल मार्गावर भरधाव डंपर  ब्रेक फेल होऊन भीषण अपघात झाला.

रविवारी दुपारी पावणेचार वाजण्याच्या दरम्यान शीव पनवेल मार्गावर भरधाव डंपर  ब्रेक फेल होऊन भीषण अपघात झाला. यात कोणी मृत झाले नसले तरी तब्बल ११ गाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तर दोन जण अंत्यवस्थ आहेत. डंपर चालक पळून गेला आहे त्याच्या विरोधात गुन्हा नोंदवण्याचे काम सुरु आहे.

हेही वाचा >>> उरणच्या ग्रामीण भागालाही कंटेनर वाहनांचा विळखा

रविवारी दुपारी साडेतीन पावणेचारच्या दरम्यान शीव पनवेल मार्गावर वाशी पथकर नाक्यानजीक एका डंपरचा (एमएच ४६ एएफ ६६९४) ब्रेक फेल झाला आणि या भरघाव डंपरने ११ पेक्षा अधिक गाड्यांना ठोस मारली. शेवटी खाडी आणि खाडी पुलाला लावण्यात आलेल्या सुरक्षा पत्र्याला धडकून डंपर थांबला. मात्र दुर्दैवाने याच ठिकाणी एका दुचाकी स्वाराला ठोकर मारली त्यात दुचाकीवर बसलेल्या दोघांची प्रकृती गंभीर असून त्यांना मनपा रुग्णालयात दाखल केले होते.  

हेही वाचा >>> नवी मुंबई : नवरात्र उत्सवात गरबा व दांडियासाठी रात्री १० पर्यंतची तर अष्टमी नवमीला १२ पर्यंतची वेळ

मुंबई पुणे मार्गिकेवर झालेल्या या अपघातानंतर डंपर चालक पळून गेला आहे, मात्र त्याच्या मदतनीसाला ताब्यात घेण्यात आले आहे.अपघात झाल्या नंतर मानखुर्द नजीक पर्यत वाहनांच्या रांगा गेल्या होत्या. संध्याकाळी साडे पाच नंतर वाहतूक पूर्ववत झाली.  ५ गाड्या टोइंग गाडी वापरून बाजूला करण्यात आल्या तर काही धक्का मारून रस्त्याच्या कडेला करण्यात आल्या ७ गाड्यांचे  मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे तर अंदाजे पाच गाड्यांचे किरकोळ नुकसान झाले आहे. यात एका दुचाकीवरील दोघांना गंभीर दुखापत झाल्या आहेत. अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक भानुदास देशमुख यांनी दिली. 

मराठीतील सर्व नवी मुंबई ( Navimumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
नवी मुंबई : नवरात्र उत्सवात गरबा व दांडियासाठी रात्री १० पर्यंतची तर अष्टमी नवमीला १२ पर्यंतची वेळ

संबंधित बातम्या

नवी मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी, बेलापूर – अलिबाग आता केवळ सव्वा तासात
गेले अनेक वर्ष गणेश नाईक नवी मुंबईचे वाटोळे करण्याचे काम करत आहेत : जितेंद्र आव्हाड
कल्याण- तळोजा मार्गावरील खड्यांनी घेतला दुचाकीस्वाराचा जीव; मार्गाची दुरुस्ती करण्यास स्थानिक शेतकऱ्यांचा विरोध
वाशी टोल नाका की वाहतूक कोंडी नाका?; टोलनाक्यावरील १८ पैकी २ लेन बंद; वाहतूक कोंडीत भर
उरणमध्ये घुमणार रास दांडियाचा आवाज; नवरात्रोत्सवानिमित्त जागरणाचे आयोजन

व्हिडिओ

ताज्या बातम्या
“महात्मा गांधींचा जातीभेदावर विश्वास होता”; रणजीत सावरकरांचा गंभीर आरोप; म्हणाले, “सावरकर जेव्हा…”
राज्यशासन ऊसदर प्रश्नी शेतकऱ्यांना दिलासा देईल; शेतकरी संघटनांची अपेक्षा
‘विकासभिमुख कारभारामुळे विरोधकांमध्ये जळफळाट’; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची टीका
“आजचं भाषण म्हणजे वैफल्यग्रस्त…” अतुल भातखळकरांचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला!
“ताई हुशार निघाल्या” म्हणणाऱ्या उद्धव ठाकरेंना भावना गवळींचं प्रत्युत्तर; म्हणाल्या, “माझ्यावर झालेले आरोप…”