नवी मुंबई : ऐरोली भागात असलेले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे माजी नगरसेवक मनोहर मढवी उर्फ एमके यांच्या तडीपार आदेशाला स्थगिती देण्यात आली आहे. एमके यांना ऑक्टोबर महिन्यात ठाणे रायगड जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले होते. हा निर्णय पोलिसांचा नसून राजकीय असल्याचा आरोप त्यांनी त्यावेळी केला होता.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नवी मुंबईत शिवसेनेत दुफळी झाली आणि शिंदे गटात मोठ्या प्रमाणात स्थानिक शिवसेना नेते गेले. मात्र जुने अनुभवी दबंग समजले जाणाऱ्या एमके मढवी यांनी शिवसेना सोडली नाही. त्यातच त्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी आणि गणेश उत्सव काळात पुन्हा त्यांच्या विरोधात दाखल झालेले गुन्हे यामुळे ते अडचणीत आले. नवी मुंबई पोलिसांनी त्यांना त्याचमुळे दोन वर्षासाठी तडीपार केले होते. राजकीय दबावाला बळी पडून पोलिसांनी हा निर्णय घेतला आहे, असा आरोप मढवी समर्थकांनी केला होता. या निर्णयाच्या विरोधात त्यांनी न्यायालयाचा दरवाजा ठोठावला होता. आज उच्च न्यायालयात या बाबत निर्णय घेण्यात आला असून तडीपार निर्णयाला स्थगिती देण्यात आली आहे.

हेही वाचा – उरण शहरातील वाहतूक कोंडीचा १२ वीच्या परीक्षार्थींना पहिल्या दिवशीच फटका

हेही वाचा – नवी मुंबई : बार व्यवसायिकाचा कारनामा, थेट सार्वजनिक शौचालयातच थाटला बार

याबाबत मढवी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी हा न्यायाचा विजय असल्याचे सांगत न्यायालयाने तडीपार निर्णय रद्द केला असल्याची माहिती दिली. मढवी यांचे जेष्ठ बंधूंचे निधन झाल्याने ते नवी मुंबईतच आहेत, असे त्यांनी सांगितले. न्यायालयाचा हा निर्णय म्हणजे शिंदे गटाला धक्का असल्याची चर्चा नवी मुंबई राजकीय वर्तुळात होत आहे.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Suspension of ex corporator manohar madhvi banish order ssb