उरण : नगर परिषदेने उरण शहरातील बेशिस्त वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी जनजागृतीसाठी डॉक्युमेंट्री तयार केली आहे. मात्र मंगळवारी १२ वीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेच्या वेळी उरण शहरातील सेंट मेरीज स्कुल या परीक्षा केंद्राजवळ वाहनांची गर्दी झाली होती. याचा फटका परीक्षार्थींना ही बसला. ही कोंडी सेंट मेरीज स्कुल ते जरी मरी मंदीर आणि उरण मोरा रस्त्यापर्यंत पोहचली होती.

१२ वीच्या महत्वाच्या परीक्षेच्या वेळी उरण शहरातील वाहतुकीचे नियोजन नसल्याने ही स्थिती उद्भवली होती. उरण शहरातील वाहतूक कोंडीला वाहन चालक आणि नागरीक ही जबाबदार असून विदयार्थ्यांना शाळेत सोडण्यासाठी येणारे पालक आणि वाहने घेऊन येणारे विद्यार्थी यांच्या बेशिस्तीने रस्त्यात वाहने उभी केल्यानेही कोंडीत भर पडली. उरण शहरातील वाहतूक कोंडी ही येथील वाहनचालक आणि नागरीक यांच्यासाठी नेहमीच झाली आहे. या कोंडीतुन सुटका करण्यासाठी उरण नगर परिषदेच्या वतीने नागरिकांच्या जनजागृतीसाठी एक डॉक्युयमेंट्री तयार केली आहे.

navi mumbai municipal corporation steps taken to prevent accidents at tandel maidan chowk in seawoods
वाहतूक बेटासह चौकाचे काँक्रीटीकरण; सीवूड्स येथील तांडेल मैदान चौकात अपघातापासून बचावासाठी महापालिकेचे पाऊल
Traffic congestion, Divisional Commissioner office area,
विभागीय आयुक्त कार्यालय परिसरातील वाहतुकीचा बोजवारा, वाहनचालकांना पाच ते दहा किलोमीटरचा वळसा
Pune Fraud Racket, Busted, Five Arrested, Cheating Citizens, Sending Money, Hong Kong, Cryptocurrency, cyber police, fraud in pune,
पिंपरी : क्रिप्टोकरन्सीद्वारे फसवणुकीचे रॅकेट हाँगकाँगमधून; पैसे मोजण्याच्या मशीनसह सात लाख रुपये जप्त
Police Raid, Spa Centers, Hinjewadi, Wakad, sex racket, Rescue Eight Women, crime in Hinjewadi, crime in Wakad, crime in chinchwad, crime in pimpri, sex racket, prostitute, police raid on spa,
पिंपरी : आयटी हिंजवडी आणि उच्चभ्रू वाकडमध्ये स्पा सेंटरवर पोलिसांचा छापा; आठ महिलांची सुटका

मात्र वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी नगरपरिषद आणि वाहतूक विभाग यांच्या नियोजनाची आवश्यकता आहे. या दोन्ही विभागांच्या धरसोड वृत्तीमुळे उरण शहरातील कोंडीची समस्या कायम आहे. या कोंडीचा फटका १२ वीच्या परीक्षेच्या पहिल्याच दिवशी बसला. पुढील महिनाभर या परीक्षा सुरू राहणार आहेत. तर ३ मार्च पासून १० वीच्या ही परीक्षा सुरू होणार असल्याने उरण नगर परिषद आणि वाहतूक विभागाने शहरातील वाहतुकीचे नियोजन करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.