The mangroves destroyed for the JNPT National Highway have burst into new life | Loksatta

जेएनपीटीच्या राष्ट्रीय महामार्गासाठी उधवस्त झालेल्या खारफुटीला फुटली नवी पालवी

साचलेल्या पाण्याने खारफुटींसाठी विषाप्रमाणे काम केले. यामुळे ५०००हून जास्त खारफुटी नेस्तनाभूत झाल्या होत्या.

जेएनपीटीच्या राष्ट्रीय महामार्गासाठी उधवस्त झालेल्या खारफुटीला फुटली नवी पालवी
जेएनपीटीच्या राष्ट्रीय महामार्गासाठी उधवस्त झालेल्या खारफुटीला फुटली नवी पालवी

जेएनपीटी ते पळस्पे या राष्ट्रीय महामार्गाच्या विस्तारासाठी ५ हजाराच्या वर खारफुटी नष्ट करण्यात आल्या होत्या. या नष्ट करण्यात आलेल्या खारफुटीला समुद्राच्या भरतीचे पाणी मिळाल्याने त्याची पूर्ण वाढ होऊन त्या पुनर्जीवित होऊ लागल्या आहेत. या घटनेला पर्यावरणतज्ञांनी निसर्गाचा चमत्कार म्हटले आहे.

हेही वाचा- नवी मुंबई मनपाला हस्तांतरित भूखंड परस्पर तिसऱ्यालाच विकला

एनएच-३४८लगतच्या पाण्याच्या प्रवाहाला थांबवण्यात आले होते. जेव्हा पर्यावरण कार्यकर्त्यांनी ही बाब उच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या खारफुटी संरक्षण व जतन समितीच्या निदर्शनास आणून दिली तेव्हा समितीने स्थळाच्या पाहणी अहवालाची मागणी केली. या संदर्भात कोकण विभागीय आयुक्त आणि खारफुटी समितीचे अध्यक्ष जगदिश पाटील यांची भेट घेतली, त्यांनी कारवाई करण्याची वचन दिले याची नॅटकनेक्टचे संचालक बी एन कुमार यांनी आठवण करुन दिली. नॅटकनेक्टने केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांना देखील ईमेल पाठवला होता.

हेही वाचा- नवी मुंबई : खासगी शाळांची मैदाने झाली टर्फची मैदाने; तर पालिकेची खेळाची मैदाने दुर्लक्षित

साचलेल्या पाण्याने खारफुटींसाठी विषाप्रमाणे काम केले. यामुळे ५०००हून जास्त खारफुटी नेस्तनाभूत झाल्या, ज्यांचा उपयोग स्थानिक रहिवाश्यांनी सरपण म्हणून करु लागले आहेत, असे कुमार यांनी सांगितले. पाण्याच्या प्रवाहाचे मागच्या वर्षी पुन:संग्रहण करण्यात आले. आजमितीला आपण ही मोठी खारफुटीची झाडे पाहू शकतो, मागच्या चार वर्षांच्या तुलनेमध्ये हे दृश्य अतिशय सुखावह झाले आहे.

हेही वाचा-नवी मुंबई : भाडे नाकारणाऱ्या मुजोर रिक्षा चालकांवर विशेष पथकाची कारवाई

खारफुटींच्या –हासाला जवाबदार असलेल्यांची ओळख अजूनही बाकी आहे. महसूल विभागाने काही प्रकरणांमध्ये एफआयआर दाखल केली असली तरी एनएच -३४८ प्रकरणामध्ये अजूनही कोणतीही कायदेशीर कारवाई करण्यात आलेली नाही, असे कुमार यांचे म्हणणे आहे. उरणच्या पागोटे मधील पाच एकर परिसरात पसरलेल्या नवी मुंबई सेझ स्थळावरील खारफुटी २०१९ मध्ये नष्ट करण्यात आल्या. मात्र पुन्हा भरतीच्या प्रवाहावरच्या या वनस्पतींची भरतीच्या पाण्याला कोणताही अडथळा न राहिल्यामुळे पुन्हा वाढ होताना दिसत आहे.

हेही वाचा- नवी मुंबई: तुर्भे डम्पिंग ग्राउंडमध्ये अग्नितांडव; तीन तासांच्या अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात

या दोन उदाहरणांनी हे स्पष्ट केले आहे की मानवी हस्तक्षेप नसल्यास आणि आंतरभरती पाण्याच्या प्रवाहाला शाबूत ठेवल्यास खारफुटी स्वत:हून वाढू शकतात, असे कुमार म्हणाले. खारफुटीच्या रोपांसाठी आता जागाच उरली नाही. दलदलींना माश्यांच्या पैदाशीसाठी आणि पक्षांच्या रहिवासांसाठी मोकळे ठेवणे आवश्यक आहे. दलदली उधवस्त झाल्यामुळे जैवविविधतेवर विपरीत परिणाम होत असल्याचे पर्यावरणवाद्याचे म्हणणे आहे.

मराठीतील सर्व नवी मुंबई ( Navimumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 06-02-2023 at 22:38 IST
Next Story
नवी मुंबई मनपाला हस्तांतरित भूखंड परस्पर तिसऱ्यालाच विकला