scorecardresearch

नवी मुंबई: तुर्भे डम्पिंग ग्राउंडमध्ये अग्नितांडव; तीन तासांच्या अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात

यात कोणीही जखमी वा मृत नाही. आग नेमकी काय लागली याचे कारण अस्पष्ट आहे.

नवी मुंबई: तुर्भे डम्पिंग ग्राउंडमध्ये अग्नितांडव; तीन तासांच्या अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात
तुर्भे डम्पिंग ग्राउंडला आग फोटो- लोकसत्ता

तुर्भे क्षेपणभूमीला आज सव्वासातच्या सुमारास अचानक मोठी आग लागली. आप विझवण्यासाठी १० पेक्षा अधिक अग्निशमन गाड्या गेल्या आहेत . तरीही आगीवर रात्री दहा पर्यंत नियंत्रण मिळवण्यात यश आले. मात्र पहाटे पर्यंत कुलिंगचे काम सुरू होते. 

नवी मुंबईतील क्षेपणभूमी तुर्भे येथे असून या ठिकाणी परवानगी शिवाय आत कोणालाही प्रवेश नाही. त्याच बरोबर आत मध्ये प्रवेश करण्यापूर्वी लायटर , काडेपेटी आदी जवळ उत्पन्न करणाऱ्या वस्तू वा ज्वालाग्राही पदार्थ घेऊन जाण्यास मनाई असून आत प्रवेश करण्यापूर्वी तपासणीही केली जाते. तरीही ही आग लागल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. 

हेही वाचा >>> एल अन्ड टी कंपनीपुढे महापालिकेचे लोटांगण ? सौंदर्यीकरणासाठी पदपथ घेऊन चक्क रस्त्यातच वाढवला पदपथ

आज मनपाने दिलेल्या माहितीनुसार सव्वासात  वाजता ही आग लागली. क्षेपणभूमीला आग लासगल्याने पूर्ण परिसरात धूर आणि उग्र दुर्गंधी पसरली होती. 

आगीची माहिती मिळताच वाशी , कोपरखैरणे, नेरुळ येथील अग्निशमन यंत्रणा घटनास्थळी पोहचली असून आग विझवण्याचा प्रयत्न करीत होती. आग विझवण्यास प्रचंड दूर आणि उग्र वास मोठी अडचण ठरत होती. रात्री साडे नऊ दहाच्या सुमारास आगीवर नियंत्रण मिळाले. मात्र पहाटे पर्यंत कुलिंगचे काम सुरू ठेवावे लागणार आहे.

पुरुषोत्तम जाधव (अग्निशमन दल मुख्याधिकारी) क्षेपणभूमी ला लागलेली आग विझवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले गेले. यात कोणीही जखमी वा मृत नाही. आग नेमकी काय लागली याचे कारण अस्पष्ट आहे.

मराठीतील सर्व नवी मुंबई ( Navimumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 03-02-2023 at 22:33 IST