लोकसत्ता प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नवी मुंबई : येथील नेरुळ परिसरातील एनआरआय तलाव आणि डीपीएस तलाव या दोन्ही पाणथळ जागा ही फ्लेमिंगोंच्या अधिवासाची ठिकाणे नष्ट करण्याचा प्रयत्न केला जात असतानाच मुंबई विमानतळावर उतरणाऱ्या विमानाच्या धडकेने ३९ फ्लेमिंगोंचा मृत्यू झाला आहे. यामागे फ्लेमिंगोंचा नवी मुंबईतील अधिवास नष्ट करण्याचा प्रयत्न सुरू असून फ्लेमिंगोंना विमानांच्या मार्गाबाबतची नैसर्गिक जाण असताना अचानक विमानांच्या मार्गात हे पक्षी का गेले याबाबत सखोल चौकशी करण्याची आवश्यकता पर्यावरणप्रेमींना व्यक्त केली आहे.

टी. एस चाणक्य व एनआरआय तलावात दररोज लाखो फ्लेमिंगोंचे आगमन होत असताना दुसरीकडे नेरुळ येथील डीपीएस चाणक्य तलवात येणारा पाण्याचा स्राोत बंद केला असल्याने फ्लेमिंगोंच्या मृत्यूच्या घटना घडली होती. तर मुंबईत सोमवारी सकाळच्यावेळी विमानाच्या धडकेत ३९ फ्लेमिंगोंचा मृत्यू झाल्याने पर्यावरणप्रेमींमध्ये संताप निर्माण झाला असून फ्लेमिंगोंचा अधिवासच नाहीसा करण्याच्या प्रकारामुळे फ्लेमिंगोंच्या मृत्यूच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

आणखी वाचा-पनवेल : बैलगाडा शर्यतीमध्ये बैलाच्या ठोकरीत एक जखमी

सिडको फ्लेमिंगोंच्या जिवावर उठले असून पाणथळ जागा नष्ट करण्याचा प्रयत्न केला जात आहे. सरकारला अनेक वर्षे ओरडून सांगतोय पाणथळ जागा वाचवा पण त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. दुर्घटनेत ३९ फ्लेमिंगोंचा मृत्यू झाला त्याचे काही नाही. याच दुर्घटनेत एखाद्या विमान प्रवाशाचा मृत्यू झाला असता तर ती ग्लोबल हेडलाईन झाली असती. -बी. एन. कुमार, संचालक, नॅटकनेक्ट

पक्ष्यांना आवाजाबाबत नैसर्गिक देणगी असते. ठाणे खाडीमध्ये भरती असल्यामुळे हे पक्षी नवी मुंबईत येतात. परंतू येथून त्यांना पहाटेच्या वेळी स्फोटक आवाज करून हाकलवण्याचा प्रयत्न झाला का? ते भरकटून विमान मार्गाच्या दिशेने गेले का अशी शंका आहे. यामागे मानवी हस्तक्षेप होता का हे तपासण्याची गरज आहे. -सुनील अग्रवाल, सेव्ह एन्व्हायर्न्मेंट

३९ फ्लेमिंगो पक्ष्यांचा मृत्यू ही अत्यंत दुर्दैवी घटना असून नवी मुंबई परिसरात पाणथळ जागा नष्ट करण्याचा प्रयत्न सातत्याने होत आहे. भरती-ओहोटीनुसार या पक्ष्यांचे ठिकाण बदलत असून याबाबत सखोल चौकशी झालीच पाहिजे. -किशोर रिठे, संचालक, बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी

आणखी वाचा-पनवेल : पोलिसांची नाकाबंदी सुरु असल्याची सबब देऊन जेष्ठाला लुटले

तपास सुरू

२० मे रोजी रात्रीच्या सुमारास घाटकोपर-अंधेरी लिंक रोड लक्ष्मीनगर, पंतनगर भागात विमानाला धडकून फ्लेमिंगो पक्षी मृत्यूमुखी पडल्याची घटना घडली. याबाबत वनविभागाला माहिती मिळताच ठाणे खाडी फ्लेमिंगो अभयारण्य वन परिक्षेत्र अधिकारी प्रशांत बहादुरे व इतर अधिकारी पोहचले होते. विभागीय वन अधिकारी दीपक खाडे, सहाय्यक वन संरक्षक विक्रांत खाडे घटनास्थळी पोहचून २९ तर मंगळवारी सकाळी आणखी १० असे एकूण ३९ फ्लेमिंगो वन विभागाने ताब्यात घेतले. पशूवैद्याकीय अधिकाऱ्यांतर्फे शवविच्छेदन करण्यात येत आहे. दीपक खाडे विभागीय वन अधिकारी व मुंबई कांदळवन संधारण घटकतर्फे सहाय्यक वन संरक्षक विक्रांत खाडे करत तपास आहेत, अशी माहिती कांदळवन कक्ष, मुंबईचे अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक एस. व्ही. रामाराव यांनी दिली.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Why do flamingos change their way 39 flamingos have died in plane crashes till now mrj