• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • डोनाल्ड ट्रम्प
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. elections gallery
  4. actor govinda joined shinde shisena after congress started new political way spl

शिंदेंच्या शिवसेनेते दाखल झालेल्या गोविंदाचा ‘फिल्मी-राजकीय’ प्रवास कसा होता? जाणून घ्या

चित्रपटांच्या प्रमोशन्समध्ये व्यस्त असणाऱ्या गोविंदावर, लोकसभेतील उपस्थितीवरून प्रश्न उपस्थित केले जात होते.

April 2, 2024 19:39 IST
Follow Us
  • govinda joined shisena
    1/9

    प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता गोविंदा याने मागच्या आठवड्यात (२८ मार्च) शिवसेना (शिंदे गट) पक्षात प्रवेश केला. (Photo-Eknath Shinde fb page)

  • 2/9

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्याचे पक्षात स्वागत केले. (Photo-Eknath Shinde fb page)

  • 3/9

    अभिनेता गोविंदा याआधीही राजकारणात होता. त्याने याआधी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. (Photo ANI)

  • 4/9

    २००४ ते २००९ या कालावधीत गोविंदा काँग्रेस पक्षामध्ये सक्रिय होता. तो उत्तर मुंबई मतदासंघातून लोकसभा निवडणुकीत विजयी झाला होता. (Photo-Eknath Shinde fb page)

  • 5/9

    २०१० ते २०२४ या काळात तो राजकारणापासून अलिप्त राहिला. त्यानंतर त्याने शिवसेना (शिंदे गट) पक्षात प्रवेश केला आहे. (Photo-Eknath Shinde fb page)

  • 6/9

    २००७ मध्ये गोविंदाचा ‘पार्टनर’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्यानंतर त्याच्यावर आरोप करण्यात आले की लोकसभेमध्ये त्याची उपस्थिती नसते. विरोधकांनी त्याला घेरल्यानंतर २००८ मध्ये, गोविंदाने राजकीय प्रवास थांबवला होता. (Photo-Govida fb handle)

  • 7/9

    त्यानंतर त्याचे चित्रपट करिअर म्हणावे तितके यशस्वी राहिले नाही. त्याचे चित्रपट क्षेत्रातील वादविवाद हाही चर्चेचा विषय झाला होता. ‘मनी हैं तो हनी हैं’ चित्रपटाच्या सेटवर शूटिंग सुरू असताना, संतोष रॉय या नवख्या अभिनेत्याला गोविंदाने कानशिलात लगावली होती. हे प्रकरण नंतर न्यायालयात गेले होते. (Photo-Govida fb handle)

  • 8/9

    दरम्यानच्या काळात गोविंदाचे काही चित्रपट प्रदर्शित झाले खरे, पण त्यांना प्रेक्षकांची तितकी पसंती मिळाली नाही. मधल्या काळात गोविंदाचे काही गाण्यांचे अल्बम युट्यूबवर प्रदर्शित झाले आहेत. त्यात त्याने स्वतः गाणी गायली आहेत. नृत्यही केले आहे. (Photo-Eknath Shinde fb page)

  • 9/9

    अशा प्रकारे गोविंदाच्या राजकीय प्रवासाच्या मध्यांतरानंतर पुन्हा सुरू झालेला राजकीय प्रवास, कसा ठरेल? हे पुढील काळात स्पष्ट होईल. (Photo-Govida fb handle)

TOPICS
एकनाथ शिंदेEknath ShindeगोविंदाGovindaमराठी बातम्याMarathi NewsराजकारणPoliticsवसई विरारVasai VirarशिवसेनाShiv Sena

Web Title: Actor govinda joined shinde shisena after congress started new political way spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.