• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • उद्धव ठाकरे
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. elections gallery
  4. tamilnadu cm mk stalin on pm modi latest news of loksabha election 2024 spl

Loksabha Election 2024: “जर मोदी पुन्हा सत्तेत आले, तर देश २००…”, तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांचा हल्लाबोल!

एम. के. स्टॅलिन म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा सत्तेत आले तर देश २०० वर्षे मागे जाईल.

Updated: April 17, 2024 16:14 IST
Follow Us
  • mk stalin on modi
    1/9

    तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांची काल (१६ एप्रिल) श्रीपेरंबुदूर येथे सभा होती. ते डीमकेचे उमेदवार टी. आर. बालू यांच्या प्रचारार्थ असलेल्या सभेत बोलत होते. (All Photo Source- M. K. Stalin/Facebook Page)

  • 2/9

    या सभेत एम. के. स्टॅलिन म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा सत्तेत आले तर देश २०० वर्षे मागे जाईल.

  • 3/9

    “भाजपा पुन्हा सत्तेत आली तर इतिहास परत लिहिला जाईल. विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या युगातून पुन्हा अंधश्रद्धा आणि अधोगतीकडे परत जावं लागेल. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच संविधान बदलून ते आर एस एस त्यांना जसे हवे आहे तसे बनवेल.” अस स्टॅलिन म्हणाले.

  • 4/9

    स्टॅलिन पुढे म्हणाले की “भाजपाला मतदान म्हणजे तामिळनाडूच्या विरोधकांना मतदान आणि एआयएडीएमके पक्षाला मतदान म्हणजे राज्याच्या गद्दारांना मतदान.” एआयएडीएमके या पक्षाला मतदान करणे म्हणजे भाजपालाच मतदान करण्यासारखे असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.

  • 5/9

    माजी मुख्यमंत्री पलानीस्वामी यांच्यावर त्यांनी सडकून टीका केली आहे. “एआयएडीएमके आणि भाजपा यांचे विचार एकच आहेत, परंतू आता निवडणुकीच्या प्रचारात वेगवेगळे वागत आहेत. निवडून आल्यावर भाजपाला पाठिंबा देणार नाही का? या प्रश्नावर पलानीस्वामी गप्पच होते.” अशी टीका त्यांनी केली.

  • 6/9

    ते पुढे म्हणाले, “एआयएडीएमके कधीच भाजपा विरुद्ध जाऊ शकणार नाही, त्यांना सर्वश्रेष्ठ गुलाम असल्यामुळे पुरस्कार दिले जात आहेत. परंतु आम्हाला जनतेने पुरस्कार दिले आहेत आणि आणखी एक पुरस्कार मिळेल तो ४ जूनला निकालाच्या दिवशी.”

  • 7/9

    ते म्हणाले की “भाजपा तामिळनाडूमध्ये फार काही करेल अशी खोटी आशा इथल्या नेत्यांकडून मोदींना दिली जात आहे.”

  • 8/9

    तामिळनाडूत डीएमके विरोधी लाट आहे, असं मोदींनी एका मुलाखतीत सांगितलं होत त्यावरुनही स्टॅलिन यांनी टीका केली आहे.

  • 9/9

    “भाजपा कितीही प्रयत्न करत असली तरी तामिळनाडूमध्ये त्यांना यश येणार नाही. त्यांना २०१४ , २०१९ मध्ये लोकांनी मतदान केलं नाही, तर आता का करतील? आणि आता तर तुम्ही लोकांना धोका देत आहात हे स्पष्ट झालेलं आहे.” अशा शब्दात त्यांनी भाजपावर टीका केली.

TOPICS
एम. के. स्टॅलिनMK Stalinभारतीय जनता पार्टीBJPमराठी बातम्याMarathi NewsराजकारणPoliticsलोकसभा निवडणूक निकाल २०२४ (Lok Sabha Election Result 2024)Lok Sabha Election

Web Title: Tamilnadu cm mk stalin on pm modi latest news of loksabha election 2024 spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.