• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. elections gallery
  4. pm narendra modis letter to nda candidates what says in letter election news spl

Loksabha Election 2024 : प्रचारानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ‘एनडीए’ उमेदवारांना लिहिलेल्या पत्रात काय म्हटलंय?

पंतप्रधान नरेंद्र मोदींचे एनडीए उमेदवारांना पत्र या पत्रामध्ये ते काय म्हणाले आहेत जाणून घ्या.

Updated: April 18, 2024 11:31 IST
Follow Us
  • narendra modi letter to candidates
    1/10

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १७ एप्रिल रोजी प्रचार संपल्यानंतर भाजपाप्रणित एनडीए आघाडीच्या सर्व उमेदवारांना व्यक्तिगत पत्र लिहिले. (सर्व फोटो साभार- नरेंद्र मोदी, फेसबुक पेज)

  • 2/10

    आपला संदेश प्रत्येक एनडीए उमेदवाराच्या मतदारसंघातील मतदारांपर्यंत पोहोचवावा, अशी अपेक्षा मोदी यांनी त्यात व्यक्त केली आहे.

  • 3/10

    देशाच्या सद्य: परिस्थितीला उज्ज्वल भविष्याशी जोडण्यासाठी ही लोकसभा निवडणूक एक संधी आहे, असे पंतप्रधान मोदी यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.

  • 4/10

    ‘‘माझ्या आयुष्यातील प्रत्येक क्षण मी लोकांच्या कल्याणासाठी समर्पित केला आहे’’, हा माझा संदेश प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचवा, अशी सूचनाही मोदी यांनी पत्रात केली आहे.

  • 5/10

    मोदी यांनी पाठवलेली दोन पत्रे भाजपाच्या उमेदवारांनी प्रसारित केली आहेत. त्यापैकी एक पत्र तमिळनाडूचे भाजपा प्रदेशाध्यक्ष आणि काईम्बतूरचे उमेदवार के. अण्णामलाई यांना इंग्रजीत, तर दुसरे भाजपाचे मुख्य प्रवक्ते आणि उत्तराखंडच्या पौरी गढवाल मतदारसंघातील भाजपाचे उमेदवार अनिल बलुनी यांना हिंदीत लिहिलेले आहे.

  • 6/10

    या पत्रांद्वारे पंतप्रधानांचा संदेश प्रादेशिक भाषांमध्ये मतदारांपर्यंत पोहोचवण्यावरही भर देण्यात आल्याचे सांगितले.

  • 7/10

    के. अण्णामलाई यांना पाठवलेल्या पत्रात त्यांच्या विजयाबद्दल मोदी यांनी विश्वास व्यक्त केला आहे.

  • 8/10

    ‘गेल्या दहा वर्षांत समाजातील प्रत्येकाच्या अडचणी दूर करून त्यांचा जीवनस्तर उंचावण्यात आला. तथापि, अद्याप खूप काही करणे बाकी असून प्रत्येकाला चांगल्या जीवनाची हमी देणाऱ्या आपल्या ‘मिशन’साठी ही निवडणूक निर्णायक असेल.” असंही या पत्रात नमूद करण्यात आलं आहे.

  • 9/10

    “गेल्या पाच-सहा दशकांच्या काँग्रेसच्या सत्ताकाळात देशातील सर्व कुटुंबांना, विशेषत: कुटुंबातील ज्येष्ठांना कोणत्या समस्यांना तोंड द्यावे लागले, ते त्यांना आठवत असेल. म्हणून ही निवडणूक आपल्या वर्तमानाला आणि उज्ज्वल भविष्य काळाशी जोडणारी एक संधी आहे.’’ अस या पत्रातून सांगण्यात आलं आहे.

  • 10/10

    हेही पहा- Loksabha Election 2024: “जर मोदी पुन्हा सत्तेत आले, तर देश २००…”, तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांचा हल्लाबोल!

TOPICS
नरेंद्र मोदीNarendra Modiभारतीय जनता पार्टीBJPमराठी बातम्याMarathi NewsराजकारणPoliticsलोकसभा निवडणूक निकाल २०२४ (Lok Sabha Election Result 2024)Lok Sabha Election

Web Title: Pm narendra modis letter to nda candidates what says in letter election news spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.