Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नेपाळ
  • अजित पवार
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. elections gallery
  4. manifesto has been released by the nationalist congress party spl

Lok Sabha Election 2024 : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (अजित पवार) जाहीरनाम्यात काय? जाणून घ्या

NCP Manifesto Release : महायुतीच्या जागावाटपाचा तिढा कायम असताना आज २२ एप्रिल रोजी राष्ट्रवादी काँग्रेसपक्षाने जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे.

Updated: April 22, 2024 18:58 IST
Follow Us
  • rashtrwadi manifesto
    1/9

    आगामी लोकसभा निवडणुकीसाठी विविध पक्षांकडून प्रचारसभांचा धडाका सुरू आहे.

  • 2/9

    महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडले तरीही जागावाटप आणि जाहीरनामा प्रसिद्ध झाला नव्हता.

  • 3/9

    महायुतीच्या जागावाटपाचा तिढा कायम असताना राष्ट्रवादी काँग्रेसपक्षाने जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे.

  • 4/9

    राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा (अजित पवार गट) आज जाहीरनाम्याची आज घोषणा करण्यात आली आहे.

  • 5/9

    यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न पुरस्कार देण्याची शिफारस करणार असल्याचं या जाहीनाम्यात म्हटलं आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या जाहीरनाम्याचे वाचन केले.

  • 6/9

    जाहीरनाम्यात काय घोषणा केल्या?
    अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी पाठपुरावा करणार
    स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न द्यावा
    शेतकऱ्यांना शेतमालाला हमीभाव मिळावा
    अपारंपरिक वीज निर्मिती
    अपारंपरिक वीज निर्मितीला चालना
    उद्योगांना प्राधान्य
    कृषी पिकविम्याच्या व्याप्तीत वाढ
    शेतकरी सन्मान निधीत भरीव वाढ
    मुद्रा कर्ज योजनेत मर्यादित वाढ
    जातीनिहाय जनगणना
    ऊर्दू शाळांना सेमी इंग्रजीचा दर्जा
    वन क्षेत्रात पाण्याचे साठे निर्माण व्हावेत यासाठी योजना
    संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत भारताला स्थायी सदस्यत्व मिळावे यासाठी पाठिंबा

  • 7/9

    “राष्ट्रवादी काँग्रेसची विकसित भारतासाठीची भूमिका स्पष्ट करणारा हा जाहिरनामा आहे. यात सार्वजनिक सेवा, पायाभूत सुविधासह आर्थिक प्रगतीचा संकल्प व्यक्त करण्यात आलाय. आरोग्य, शिक्षण, स्वच्छता, पर्यावरण आणि रोजगार ही ग्रामविकासाची पंचसूत्री सांगतानाच त्यानुसार आम्ही काम करणार आहोत.” असं अजित पवार यांनी यावेळी स्पष्ट केलं.

  • 8/9

    “देशाच्या स्वातंत्र्याची ७५ वर्षे पूर्ण झालेली आहेत. या अमृतकाळातील लोकसभा २०२४ साठीचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा जाहीरनामा आम्ही जनतेच्या हाती सोपवत आहोत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कायम विकास आणि विश्वासाने राज्यातील जनतेचा पसंतीचा पक्ष राहील आणि ‘राष्ट्रासाठी राष्ट्रवादी’ या भूमिकेचा जनता स्वीकार करेल.” असं अजित पवार यावेळी म्हणाले.

  • 9/9

    (सर्व फोटो साभार- अजित पवार, फेसबुक पेज)

TOPICS
अजित पवारAjit Pawarभारतीय जनता पार्टीBJPमराठी बातम्याMarathi NewsराजकारणPoliticsराष्ट्रवादी काँग्रेस पक्षNCPलोकसभा निवडणूक निकाल २०२४ (Lok Sabha Election Result 2024)Lok Sabha Election

Web Title: Manifesto has been released by the nationalist congress party spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.